हदगांव, शेख चांदपाशा| मा. भारत निवडणूक आयोग यांनी आज दि. १५/१०/रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.
त्याअनुषंगाने अविनाश कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी, ८४ हदगाव विधानसभा मतदार संघ, तथा उपविभागीय अधिकारी, हदगाव यांनी आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी, यांनी तहसिल कार्यालय हदगाव येथे विधानसभेची आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुख व पत्रकार यांची आढावा बैठक घेऊन निवडणूक आयोगाचे आदर्श आचार संहिते बाबत दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने काय करावे किंवा काय करु नये याबाबतचे तंतोतंत पालन करण्याबाबत सुचना दिल्या. सदर बैठकीस श्रीमती पल्लवी टेमकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हिमायतनगर व इतर प्रशासकीय १६ कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
हदगाव विधानसभा क्षेत्रा करिता म निवडणूक प्रक्रिया सुरळीत व वेळेत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून मतदार संघामध्ये एकूण FST 04, SST-04 VVT-04, ZO अधिकारी – 30 यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच तहसिल कार्यालय, हदगाव येथे २४ विविध कक्ष स्थापन करण्यात आलेले असून त्याकरीता २४ नोडल अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली आहे.