Election Officer Avinash Kamble : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक अधिकारी अविनाश कांबळे यांची तातडीची आढावा बैठक -NNL
हदगांव, शेख चांदपाशा| मा. भारत निवडणूक आयोग यांनी आज दि. १५/१०/रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.
त्याअनुषंगाने अविनाश कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी, ८४ हदगाव विधानसभा मतदार संघ, तथा उपविभागीय अधिकारी, हदगाव यांनी आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी, यांनी तहसिल कार्यालय हदगाव येथे विधानसभेची आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुख व पत्रकार यांची आढावा बैठक घेऊन निवडणूक आयोगाचे आदर्श आचार संहिते बाबत दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने काय करावे किंवा काय करु नये याबाबतचे तंतोतंत पालन करण्याबाबत सुचना दिल्या. सदर बैठकीस श्रीमती पल्लवी टेमकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हिमायतनगर व इतर प्रशास...
