श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक, तलाठी मुख्यालयी तर राहत नाही व पुसद, किनवट, नांदेड, यवतमाळ.येथून अप -डाउन करतात ह्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, नागरीक त्रस्त झाले आहेत . ग्रामसेवक आणि तलाठयांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी समनक जनता पार्टी ता.अध्यक्ष रवी राठोड यांनी केली आहे.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे तिन-तेरा वाजले असुन तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी.विद्यार्थी.निराधार वर्ग व इतर नागरिकांना लहान-लहान कामासाठी शहर मुख्यालयी येवून तलाठी आणि ग्रामसेवकाचा शोध घ्यावा लागत आहे.
सध्या शेतकऱ्यांना क्रॉप लोन, घरकूल.तसेच विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिक, निराधार.ना काही दाखल्यांची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मुख्यालयी राहत नसलेल्या ग्रामसेवक आणि तलाठ्याचा शोध घ्यावा लगत आहे. ग्रामीण भागातील नागरिक माहूर तालुका मुख्यालय गाठतात. आल्यानंतर संबंधित तलाठ्याचा किंवा ग्रामसेवकाचा फोन लागत नाही.
फोन लागला की थांबा मी येत आहे. मी इथे आहे तिथे आहे असा उत्तर देतात आणि लोकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. कधी लोकांचे काम होते तर कधी नाही. काही गावातील लोकांना कामाविना परत जावे लागत आहे. एक तर कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्याची शोध घेत आलेल्या गावकऱ्याला भेटत नाही. शासनाने तलाठी व ग्रामसेवक यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती केली आहे. पण हे कर्मचारी नेमुन दिलेल्या ठिकाणी न राहता संपूर्ण कारभार शहर मुख्यालयी राहुन करीत आहेत. ग्रामीण भागातील या कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची एलर्जी असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची कामे वेळेवर होत नसल्याचे ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे. संबंधित विभागाकडे तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामसेवक. तलाठी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहाणे शासनाने बंधन कारक केले असून सुद्धा बऱ्याच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक दाखला जोडून मी मुख्यालयी राहत असल्याचे परस्पर सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी रवी राठोड यानी केली आहे .