नांदेड| साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी १ आॅगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दारू विक्री बंद ठेवावी व सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी. अशा आशयाचे निवेदन जिल्हा जयंती मंडळ नांदेड च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई द्वारा जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचे मार्फत निवेदन देवून मागणी करण्यात आली.


या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे जिल्हा जयंती मंडळ नांदेड चे संयोजक गणेश अण्णा तादलापूरकर, उपाध्यक्ष मारुती चिवळीकर, सचिव राजू जाधव उर्फ ईश्वर अण्णा जाधव, सल्लागार प्रा. देविदास इंगळे, गणपत रेड्डी, सुरेश तारू वांगीकर, संजय गायकवाड, दिगंबर घायाळे, सतीश डोंम्पले, सोनू रेड्डी, भगवान जाधव, साई जाधव, खंडू वाघमारे, दत्ता गायकवाड, बबन संपते आदी मान्यवर उपस्थित होते.




