उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु) लोहा येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिमवत वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी , शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र. प्र. षडाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात दि . २८ ऑक्टोबर २०२४ पासून श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी यात्रेनिमित्त जिजाऊ बल्ड सेंटर शिवाजी नगर नांदेड यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दि.चार नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी पाच वाजता श्री संत अगडंमबुवा पालखीचे अग्नी प्रवेश होईल.
कलंबर बु. ता. लोहा येथे अनेक वर्षांपासून श्री संत अगडंमबुवा यात्रा चालू आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त व गावातील बाईल लेक आवर्जून दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांची गर्दी उसळते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहात पहाटे ४ ते ५ काकडा भजन , सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण , ९ ते ११ गाथा भजन , १२ ते ४ महीला मंडळ भजन , सायं. ४ ते ५ ज्ञानेश्वरीवर प्रवचन , ५ ते ६ हरिपाठ , रात्रौ ९ ते ११ हरि किर्तन व हरिजागर , आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत.
मित्ती कार्तिक शु. तृतीय दि. ३ नोव्हेंबर २०२४ रविवारी सायंकाळी ७ वाजता , आग्नी पुजा करुन अग्नी प्रज्वलित करण्यात येईल , व रात्रभर संगित भजनाचा कार्यक्रम दणदणीत होईल. मित्ती कार्तिक शु. ४ चतुर्थी दि.४ नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी पाच वाजता श्री संत अगडंमबुवा यांची पालखी अग्नीकुंडातून प्रवेश केल्यानंतर , गावातील प्रमुख रस्त्याने टाळ मृदंग वीणाच्या निनादात मिरवणूक निघेल , ११ ते १ काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहात नामवंत किर्तनकार व प्रवचनकार म्हणून दि. २८ रोजी प्रवचनकार म्हणून शिवभक्त शिवराज महाराज कलंबरकर , तर किर्तनकार ह.भ.प. ज्ञानोबा माऊली गुंडेवाडीकर , दि.२९ ऑक्टोबर रोज मंगळवारी प्रवचनकार ह.भ.प. दत्तराम पाटील सोरगे तर किर्तनकार ह भ. प. ज्ञानेश्वरी महाराज भारती आळंदीकर , दि.३० बुधवारी प्रवचनकार ह भ. प. गुरू गयबी नागेंद्र महराज भारती पानभोसीकर , तर किर्तनकार ह भ.प. एकनाथ महाराज आळंदीकर , दि. ३१ गुरूवारी प्रवचनकार म्हणून ह. भ.प. बाबुराव उमाजीराव गोरे कलंबरकर , तर किर्तनकार ह. भ.प. नामदेव महाराज दापकेकर ,
दि.१ नोव्हेंबर रोज शुक्रवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. दत्तराम पाटील पोखरभोसीकर तर किर्तनकार ह. भ.प. निवृतीनाथ महाराज ईसादकर , दि. २ नोव्हेंबर शनिवारी प्रवचनकार म्हणून ह. भ.प. माधव पाटील घोरबांड , तर किर्तनकार ह.भ.प. भगवान महाराज सेंद्रेंकर , दि.३ नोव्हेंबर रोज रविवारी सकाळी ९ वा. किर्तनकार म्हणून ( बाल किर्तनकार आळंदी ), ह. भ. प. ओमकार महाराज धुमाळवाडीकर , दि ४ नोव्हेंबर सोमवारी काल्याचे किर्तन सकाळी ११ वा . ह.भ.प. भिमराव महाराज सुर्यवंशी फुठाणेकर यांचे होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दि. ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, होतकरू महीला, पुरुष यांनी रक्तदान शिबीराचा आणि श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील कार्यक्रमाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी व यात्रा कमिटी कलंबर बु लोहा यांनी केले आहे.