Shri.Sant Agdambuwa Yatra at Kalambar : कलंबर ( बु. ) येथे श्री.संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा -NNL
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु) लोहा येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिमवत वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी , शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र. प्र. षडाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात दि . २८ ऑक्टोबर २०२४ पासून श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी यात्रेनिमित्त जिजाऊ बल्ड सेंटर शिवाजी नगर नांदेड यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दि.चार नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी पाच वाजता श्री संत अगडंमबुवा पालखीचे अग्नी प्रवेश होईल.
कलंबर बु. ता. लोहा येथे अनेक वर्षांपासून श्री संत अगडंमबुवा यात्रा चालू आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त व गावातील बाईल लेक आवर्जून दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. पंचक्रोशीतील हजारो भाविक ...
