उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव विषयावर आधारित दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर ” आकाश दिवा निर्मिती ” उपक्रम नुकताच घेण्यात आला. यास विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेऊन आकाशदिवे बनविल्याने पालकवर्गातुन कौतुक होत आहे.
मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे शाळेत शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्यातून शाळा स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी साठी अभ्यास पूर्ण नवचैतन्याची जाणीव करून देत असतात. प्रथम सत्राच्या परिक्षा संपल्यावर शाळेला दिपावली निमित्त सुट्टी असते. या अनुषंगाने दिपावली दिनाचे औचित्य साधून इयत्ता सहावीच्या वर्ग शिक्षिका सो. मिनाक्षी लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
आकर्षक रंगसंगती, सुबकपणे साकारण्यात आलेल्या आकाशदिव्यांचे सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांच्या पालकांनी कौतुक केले आहे. दुर्गेश्वरी घोरबांड, धनश्री साखरे, साफीया शेख, मिस्बा आदमनकर, प्राची साखरे, राजनंदनी काळम, कोमल जाधव, तनुजा शेकापूरे, सोनी कांबळे, आशा शेकापूरे या विद्यार्थिनीचे मुख्याध्यापिका विद्या वांगे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.