हिमायतनगर, अनिल मादसवार| आदिलाबाद ते नांदेड दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वे गाडीला प्रवाशी डब्यांची संख्या कमी आहे. परिणामी प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत असून, गर्दी एवढी होत आहे की, पाय ठेवायला ही जागा मिळत नसल्याचे प्रवाशांकडून सांगीतले जात आहे. म्हणून या रेल्वे गाडीला प्रवाशी डब्बे ववाढविण्यात यावेत अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
तिरुपती, आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस रेल्वे गाडी ही रात्री साडे दहा वाजता हिमायतनगर रेल्वे स्थानकावर येते. आणी हीच गाडी आदिलाबाद वरून नांदेडला जाण्यासाठी सकाळी ८ वाजता निघून ती हिमायतनगर रेल्वे स्थानक येथे ती सकाळी साडेनऊ वाजता येते. ही रेल्वे गाडी आदिलाबाद व तसेच किनवट, बोधडी, ( इस्लापूर ) सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड चे प्रवाशी घेऊन नांदेडला जाते. विशेष करून हिमायतनगर येथे प्रवाश्यांची संख्या जास्त आहे.
कारण हिमायतनगर शहर हे बाजारपेठ असल्याने विदर्भ, तेलंगणातून प्रवाशी मोठया संख्येने येत असतात. सध्या आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस ही गाडी प्रवाश्यांसाठी डोके दुखी ठरत आहे. या गाडीला प्रवाश्यांची संख्या जास्त आणी प्रवाशी डब्ब्याची संख्या मात्र कमी. अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेगाडी खचाखच भरून जात असल्याने प्रवाश्यांना जागा नसल्याने तब्बल दोन अडिच तासाचा प्रवास उभ्याने करावा लागत आहे.
महिला, वयोवृद्ध आणि अपंग प्रवाश्याना तर खूपच अडचण येत असून, पाय ठेवायाला ही जागा नसल्याने प्रवाश्यांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. प्रवाहस्यांची होणारी हि अडचण लक्ष्य घेता या रेल्वे गाडीला प्रवाशी डब्ब्याची संख्या वाढवून प्रवाश्यांना दिलासा द्यावा. आणि सुरक्षित व विना अडचण प्रवासाची हमी द्यावी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माने, संदीप तुप्तेवार, दशरथ हेंद्रे, आदींसह प्रवाशांकडून केली जात आहे.