Passenger coaches should be increased : आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस गाडीला प्रवाशी डब्बे वाढविण्यात यावे – रेल्वे प्रवाश्यांची मागणी -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| आदिलाबाद ते नांदेड दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वे गाडीला प्रवाशी डब्यांची संख्या कमी आहे. परिणामी प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत असून, गर्दी एवढी होत आहे की, पाय ठेवायला ही जागा मिळत नसल्याचे प्रवाशांकडून सांगीतले जात आहे. म्हणून या रेल्वे गाडीला प्रवाशी डब्बे ववाढविण्यात यावेत अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
तिरुपती, आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस रेल्वे गाडी ही रात्री साडे दहा वाजता हिमायतनगर रेल्वे स्थानकावर येते. आणी हीच गाडी आदिलाबाद वरून नांदेडला जाण्यासाठी सकाळी ८ वाजता निघून ती हिमायतनगर रेल्वे स्थानक येथे ती सकाळी साडेनऊ वाजता येते. ही रेल्वे गाडी आदिलाबाद व तसेच किनवट, बोधडी, ( इस्लापूर ) सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड चे प्रवाशी घेऊन नांदेडला जाते. विशेष करून हिमायतनगर येथे प्रवाश्यांची संख्या जास्त आहे.
कारण हिमायतनगर शहर हे बा...
