उस्माननगर l सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण पुरकतेचा संदेश देत श्री गणेश उत्सव २०२५ मिरवणुकीमध्ये डीजे मुक्त , डाॅल्बी, कर्कश आवाजाचा वापर न करता पर्यावरण पुरक मुक्त मिरवणूक काढल्या बद्द्ल काटकळंबा कंधार येथील छत्रपती बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजे मुक्त असा ऐतिहासिक निर्णय घेतला.


महाराष्ट्र पोलीस दल व नांदेड जिल्हा पोलीसांच्या आणि उस्माननगर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्सव शांततेत काढल्याबद्दल नांदेड जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काटकळंबा ता . कंधार येथील छत्रपती बाल गणेश मंडळांचे नांदेड जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. काटकळंबा येथे अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते मंडळांचे गणेश केरबा पाटील वाकोरे , सुभाष पाटील वाकोरे , साईनाथ पाटील वाकोरे , व्यंकटराव विभुते , मनोहर पाटील वाकोरे , पवन पाटील वाकोरे , आदिनाथ कोंडा मंगले , राम पाटील वाकोरे , गजानन चौडे ( पोलिस पाटील काटकळंबा ) , यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात काटकळंबा येथील छत्रपती बाल गणेश मंडळाचा आदर्शवत उपक्रम पाहता त्यांना प्रशिस्तपत्र देऊन गौरव करण्यात आला. गणेशोत्सव काळात केवळ विसर्जन मिरवणूकीवरच नाही, तर उपक्रमावर भर दिला होता. शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व डाॅल्बी वगळून केवळ पारंपरिक वाद्ये लावून आणि संगीत भजनाच्या निनाद गजरात पार पडली .

गावकऱ्यांच्या मोठ्या सहभागामुळे मिरवणूक शांततेत व मंगलमय वातावरणात झाली. सपोनि संजय निलपत्रेवार यांनी यावर्षी प्रत्येक गणेश मंडळांना पर्यावरण पुरक व डीजे मुक्त करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचे फळ मिळाल्याचे समाधान गावागावातुन ऐकावयास मिळते आहे.

