नांदेड। राष्ट्रीय महामार्ग 361 शिरूर ताजबंद ते पूज्यनीय डॉ. हेडगेवारजीं चे मूळ गांव कंदकुर्ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 बीबी ला जोडू असे आश्वासन केंद्रिय परिवहन आणि महामार्ग मंत्री श्री नितीन जी गडकरी यांनी खा. डॉ.अजित गोपछडे यांना दिले. या प्रसंगी खा डॅा अजित गोपछडे यांनी शिरूर (ता) ते कंदकुर्ती राष्ट्रीय महामार्ग जोडण्यासंदर्भात निवेदन मा श्री नितीनजी गडकरी साहेबांना त्यांच्या निवासस्थानी जावून सादर केले.
पूज्यनीय डॉक्टर हेडगेवार यांचे मूळ गांव राष्ट्रीय महामार्गास जोड़ल्यामुळे महाराष्ट्र तेलंगाणा सरहद्दी वरील अविकसित भागात देश-विदेशातुन अनेक जण सहजपणे यात्रा करू शकतील. येथून जवळ बासर येथे ज्ञान सरस्वती मंदिर आहे. पूर्वी पासून भाविक पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. त्यांची देखील मोठी सोय होईल.
लातूर, नांदेड, निजामाबाद जिल्ह्यातील अनेक दुर्लक्षित गावे महामार्गास जोडले जातील. येथील लोकांचा व्यापार आणि दळणवळण यासाठी निजामाबाद आणि हैदराबाद कडे जास्त संपर्क आहे. येथील सर्व प्रकार चा शेतीमाल, व्यापारी आणि औद्योगिक मालाची वाहतूक सुलभ होईल. कमी वेळेत वेगवान आणि सुखदाई प्रवास होईल.
यामुळे या दुर्लक्षित भागात विकास प्रवाह सुरू होईल.
पूढील प्रमाणे हा मार्ग प्रस्तावित आहे. राष्ट्रीय महामार्ग 361- शिरूर ताजबंद- जांब- मुखेड़- गडगा- नरसी- बिलोली- सगरोळी फाटा – कुंडलवाडी- नागनी- तेलंगाना सीमा- खंडगांव- कंदकुर्ती – चीना मावदी – पेगडपल्ली – राष्ट्रीय महामार्ग 161 बी. बी. अशा प्रकारे प्रस्तावित महामार्ग झाल्यास या दुर्लक्षित भागाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यटन इत्यादि दृष्टिकोणातुन विकास होईल. याचे दूरगामी लाभ कंधार, मुखेड, देगलूर,नायगाव व बिलोली भागातील सर्व नागरिकांना होतील.