हिमायतनगर /ढाणकी। अर्धापूर – माहूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय या नावाने अस्तित्वात आला हा मार्ग अर्धापूर – तामसा – आष्टी – जवळगाव – हरदडा – ढाणकी – फुलसावंगी पर्यंतच काम झाले. या मार्गाचे दोन वेगवेगळ्या निविदा निघाल्या एक अर्धापूर हिमायतनगर तर दुसरी हिमायतनगर फुलसावंगी या निविदा दैनिक गावकरी ह्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम मात्र अर्धापूर – घारापुर – बोरी – हरदडा – ढाणकी फुलसांवगी असे करण्यात आले आहे. गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला असल्याचे दिसून येत असून, मंजूर निविदेत दाखविलेला मार्ग अन्य ठिकणाहून कसा काय केला… याचं गौड बंगाल काय..? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे.
मंजूर रस्त्याचे अपवाद फक्त मेट ते निगंनुर पाझर तलावापर्यंत डांबरी काम का झाले ? व कसे? हे देवालाच माहित. हा रस्ता क्रमांक 752 आय गुगल वर दाखवायला पाहिजे होता परंतु हा महामार्ग प्रत्यक्षात हिमायतनगर – पळसपुर – डोलारी – बुदली – उजाड – गांजेगाव – ढाणकी असा दाखविळा गेला आहे. बहुतेक गुगल मॅपवर शत प्रतिशत वस्तुस्थिती दाखवविली जाते हे यावरून दिसून येत आहे. तर मंग ही कसली गंमत की गुगल मॅपवर घारापुर, बोरी, ब्राह्मणगाव, हरदडा, ढाणकी हा रस्ता दाखवायला पाहिजे होता. परंतु गुगल मॅपवर हा मार्ग हिमायतनगर – पळसपुर – डोलारी – गांजेगाव मार्गे दाखवत आहे. त्यामुळे जनतेची अक्षम्य दिशाभूल होत असल्याने या राष्ट्रीय महामार्ग कामाचे आचार्य व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे लोकांना हे कळेना झाले की… गूगल मॅपवर चुकीचा रस्ता टाकला की रोड ठेकेदार ने चुकीचा केला… याच्या मुळाशी दडलय तरी काय? या रस्त्याची नेमकी वस्तुस्थिती काय? असा प्रश्न विकासप्रेमी जनतेला पडत आहे. हा महामार्ग नेमका कोण्याप्रकारे मंजूर आहे व कोणत्या मार्ग झाला आहे.. हा यक्ष प्रश्न जनतेला पडला आहे. संबंधित खाते प्रमुखाला या भागातील जनता विचारत आहे की, महाराष्ट्राचे अधिवेशन चालू आहे. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा करून या मार्गाचा खरा मार्ग कोणता गुगल मॅपचा की… ठेकेदार यांनी बनवलेला…. अशी मागणीही पुढे येऊ लाली आहे. एकूणच या प्रकारामूळे विकासप्रेमीं जनता गोंदळात पडली असून, google फोटो वरून या रस्त्याचे गौडबंगाल काय ते लक्षात येईलच. याबाबतीत नूतन खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना या रस्त्याबाबत पूर्ण कल्पना आहे, तेंव्हा ते पळसपुर मार्गे हा रस्ता पूर्णत्वास जाईल यासाठी प्रयत्न करील का..? याकडे सर्वांचे लक्ष लावून आहे.