नांदेड | शिवपुराण कथेसाठी पं.प्रदीप मिश्रा यांचे विमानाने आगमन झाले. पद्मजा सिटीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार यांनी पं. प्रदीप मिश्रा यांचे स्वागत केले तर महिलांनी औक्षण केले.
श्री कुबेरश्वर धाम, मोदी मैदान कौठा येथे पं.प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा उद्या 23 अॉगस्ट शुक्रवार दुपारी 1 ते 4 या दरम्यान पार पडेल. 29 अॉगस्ट पर्यंत शिवपुराण कथा चालणार आहे. पं. प्रदीप मिश्रा यांचे विमानाने नांदेड विमानतळ आगमन झाले. विमानतळावर पं. प्रदीप मिश्रा यांचे संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
डॉ. शिवराज नांदेडकर यांचे निवासस्थान असलेल्या पद्मजा सिटीत पं. प्रदीप मिश्रा यांचा मुक्काम राहणार आहे. त्यांचे पद्मजा सिटीच्या प्रवेशद्वारावर जंगी स्वागत करण्यात आले. बॅंड बाजाने मिरवणूक काढण्यात आली. महिला कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. श्री कुबेरेश्वर धाम मोदी मैदान कौठा येथे तीन वॉटर फ्रूप मंडप उभारण्यात आले असून येणाऱ्या भाविकांना संयोजकाच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शिवपुराण कथेसाठी भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. मंडपातच भाविकांनी मुक्काम ठोकला आहे. दुपारी पाऊस झाल्याने सर्वत्र चिखल झाला असून भाविकांची गैरसोय झाली.पण सर्व अडचणीवर मात करत भाविक पं.प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी आतूर आहेत.