नवीन नांदेड l श्री सत्याई देवीची त्रैवार्षिक यात्रा महोत्सव-2025 काकांडी ता. जि. नांदेड येथे दि 14 जानेवारी दि.16जानेवारी 25 दरम्यान आयोजित करण्यात आली असून यात्रे दरम्यान 14 जानेवारी रोजी महाअभिषेक, पारंपरिक पुजा 15 जानेवारी हभप संत समाधान महाराज यांचे हरि किर्तन, देवी भक्तांचा डाक व जागरण,हभप संत अनंता बद्रीनाथ महाराज तनपुरे पंढरपूर यांचे हरि किर्तन व 16 जानेवारी रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे याही नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या काकांडी येथील सत्याई देवीच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त 14 ते 16 जानेवारी 25 या कालावधीत मोठ्या उत्साहाने सुरू होत आहे. श्री सत्त्याई देवीस पूर्वी बोकड बळी देण्याची अनिष्ट परंपरा व श्रध्दा होती वै. कर्मयोगी श्री संत गाडगेबाचा यांच्या प्रेरणेने व वै.ह.भ.प.श्री संत तनपुरे बाबा पंढरपूरकर यांच्या प्रयत्नाने इ.स.1938 पासून पशुहत्या बंद करून देवीस पूरण-पोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली त्यामुळे तेव्हा पासून श्रध्दा भक्ती श्रेष्ठ विचार, सामाजिक ऐक्य व आदर्श परंपरा निर्माण झाली.
या यात्रे निमित्य अखिल भारतीय सुप्रसिध्द असलेले सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,दिव्यज्ञान व डोळस भक्तीचा संदेश देणारे सामाजिक,राजकिय,शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील अनेक पुराण व श्रेष्ठ विभूतीने गौरविलेले कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांचे अनुग्रहित शिष्य व सर्वांचे सदगुरू संत वै.ह.भ.प.श्री संत तनपुरे बाबा यांचा ज्ञान भक्ती,वैराग्य, समाजसेवा, अन्नदान इत्यादीचा वारसा सतत चालविणारे उच्च विद्या विभूषित,अध्यात्मज्ञान व तत्वज्ञान आचरून समाज प्रबोधित करणारे थोर सुपुत्र ह.भ.प.श्री संत ब्रदीनाथ महाराज तनपुरे यांच्या कृपा आशिर्वादाने ही यात्रा महोत्सव होत आहे.
कार्यक्रमास प्रमूख उपस्थिती श्री.ह.भ.प.बद्रिनाथ महाराज तनपुरे पंढरपुर,श्री.हभप वासुदेव महाराज कोलंबीकर, श्री.हभप किशन महाराज बरबडेकर श्री.हभप मधुसूदन महाराज कापसीकर, श्री.हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, श्री.हभप विश्वनाथ महाराज काकांडीकर,हभप कृष्णा महाराज मारतळेकर,हभप यज्ञकांत महाराज कांकाडीकर यांच्या संत महंत व मान्यवर यांच्यी उपस्थिती राहणार आहे.
दि.14जानेवारी 25 रोजी सकाळी 6 वाजता देवीचा महाभिषेक ,दुपारी 4 वाजता देवीची पारंपारीक पूजा,रात्रौ 9 ते 11ह.भ.प.श्री संत समाधान महाराज भोजेकर यांची हरिकिर्तन सेवा व रात्री 11 नंतर देवी भक्तांची डाक व जागरण ,१५ जानेवारी २५ बुधवार रात्रौ 9 ते 11ह.भ.प.श्री संत अनंता बद्रिनाथ महाराज तनपुरे पंढरपूरकर यांचे हरिकिर्तन ,16 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि.15 व दि.16 या दोन दिवशीय आनंद लोकनाट्य कला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असुन यात्रे निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहुन दर्शन घेण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी काकांडी यांनी केले आहे.