किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट शहरासह पोलिस स्टेशन हद्दीतील मटका , जुगार , अवैध गुटका व दारू विक्री जोरात चालू असल्याने तरुण पिढी बर्बाद होवून गुन्हेगारी कडे वळत असल्याने हे अवैध धंदे त्वरित बंद करा अन्यथा तालुक्यातील नागरिकांना सोबत घेवून आपल्या कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देणारे निवेदन साई पि. अशोक तिरमनवार यांनी पोलिस निरीक्षक किनवट यांना दिले आहे.
किनवट शहराच्या परिसरातील छोटया व मोठ्या गावात अवैध मटका , जुगार , गुटका व दारू विक्री जोरात चालु आहे. क्या बाबीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्यानेच , मारामाऱ्या , चोऱ्या , दारू च्या नशेत खुणाच्या घटना घडत असल्याने शेकडो जनाचे संसार व कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अनेक वेळा अनेकांनी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून ही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शहरातील शेकडो तरुणांनानी आज एकत्र येवून पोलिस निरीक्षक किनवट यांना त्वरीत अवैद्य धंदे बंद करा अन्यथा तिव्र आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन साई तिरमनवार यांनी दिले.
या वेळी शहरातील शेकडो तरुण उपस्थितीत होते. त्यातच नांदेड जिल्ह्यातील उपमहानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांनी सूत्रे हाती घेतल्याने आता तरी अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा आता नागरिकांतून व्यक्त होत आहेत .