नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलामध्ये दि. २१ ऑक्टोबर रोजी गणितातील अलीकडील विकासावर ऑन सम रिसेंट डेव्हलपमेंट इन मॅथेमॅटिक्स या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस चे वरिष्ठ गणित तज्ञ प्रो. के. श्रीनिवास यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे प्रो. के. श्रीनिवास, बिट्स पिलानी, हैदराबाद कॅम्पसचे (बीआयटीएस पिलानी) प्रो. बी. मिश्रा आणि आयआयआयटीडीएम, चेन्नईचे प्रो. एम. सुब्रमणी उपस्थित होते.
प्रो. श्रीनिवास यांनी आपल्या उद्घाटन भाषणात गणित आणि सांख्यिकीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधींबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कष्टाचे महत्त्व, संशोधनाच्या नव्या दिशा आणि या क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी विविध संकल्पना मांडल्या. विविध सत्रांमध्ये गणितातील अलीकडील विकास, तांत्रिक व व्यावहारिक उपयोग यावर माहिती देण्यात आली. गणित क्षेत्रातील सुमारे ७५ विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे आयोजन सचिव डॉ. उषा सांगळे आणि संयोजक प्रा. डी.डी. पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. बी. एस. रेड्डी, डॉ. आर.एस. जैन, डॉ. ए.ए. मुळे, डॉ. एन.एस. दारकुंडे, यू. एस. दिव्यवीर यांच्यासह संशोधक विद्यार्थी यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.