किनवट, परमेश्वर पेशवे। रस्ते विकासावर भर दिला खरा मात्र केलेल्या कामाच्या दर्जाची कंत्राटदाराने वाट लावल्यामुळे कोठारी ते पार्डी-बोधडी जाणार्या मार्गावरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला. नेमकाच रहदारीला पूल खुला करुन दिला होता. पूल दिवसा कोसळल्यामुळे वाहनांचा अपघात टळला. रात्री कोसळला असता तर कित्येक वाहनांचे अपघात झाले असते हे सांगणे कठीण होते.
कोठारी ते पार्डी-बोधडीकडे जाणार्या मुख्य मार्गाचे कांही ठिकाणी डांबरीकरण आणि लहान पुलांचे बांधकाम करण्यात आले. डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा लपून राहिलेला नाही. किनवट ते मांडवा जाणार्या मार्गावर कमी जाडीचा डांबराचा थर देऊन गुत्तेदार कामाची गुंडाळपट्टी करीत असतांना वंजारवाडीतील कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क कामच थांबवल्याने प्रशासनातील संबंधित अभियंत्यांनी तात्काळ दखल घेतल्याने दुसर्याच दिवस्यी पुन्हा आवश्यकतेनुसार डांबरीकरण केल्यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या क्वाॅलीटीचे पित्तळ उघडे पडले होते. जनरेट्यामुळे दुसर्यांदा डांबरीकरण करण्याची नामुष्की कंत्राटदारावर ओढावली हा या वर्षीचा नवा इतिहास म्हणावा लागेल.
कोठारी-कोपरा-धानोरा असा हा नांदेड जाणारा कमी अंतराचा प्रसंगानुरुप एकमेव पर्यायी मार्ग आहे. कोपरा घाटातील कामाची वाताहात झाली आहे. घाटातील काम कधी पूर्ण होणार यावर खूपकांही अवलंबून आहे. शनिवारपेठ गावाजवळ नविन पूल बांधण्यात येऊन मागिल अठवड्यातच दळणवळणासाठी खुला केला होता. एकेदिवस्यी पुलाचे छत कोसळले मात्र वेळीच दखल घेतल्याने दुर्घटना टाळता आली. बांधकाम विभागाने याही कंत्राटदाराची कान उघाडणी केल्यामुळे कंत्राटदाराने सावरासावर करुन छत टाकल्याचे दिसते.
याविषयी जनप्रतिनिधी चक्कार शब्द बोलण्याचे धाडस करतांना दिसत नाहीत. दोन रस्त्याच्या दोन तर्हा समोर आल्यात. असे अनेक मार्ग आहेत मात्र त्याची चर्चा व्हायला पाहिजे. तरच रस्तेविकासाच्या दर्जेदार कामाला गती मिळणार आहे. नसता थातूरमातूर गुंडाळपट्टी करुन रस्तेविकासाचे कंत्राटदार तिनतेरा वाजवल्या शिवाय राहाणार नसल्याची नागरीकांनी भीती व्यक्त केलीय.