लोहा l लोहा शहरात वाजत गाजत ढोल ताशांचा गजर . लेझीम , जिजाऊ वेशभूषा केलेल्या विद्यार्थीनी याचा समावेश..जय जिजाऊ ..जय शिवराय या दुमदुमणाऱ्या घोषणा .राष्ट्रमाता जिजाऊ याच्या तैलचित्रासह भव्यदिव्य शोभा यात्रा लोहा शहरात (१२ जानेवारी) पार पडली.


जिजामाता शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या दहा वर्षा पासून सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म जयंती निमित दरवर्षी शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येते.


जुन्या शहरातील शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी साडे दहा वाजता माजी आ. रोहीदास चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार नगराध्यक्ष शरद पवार, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे ,माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्य करिम शेख, संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .


यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ .अंबलवाड मॅडम ,संस्थेच्या संचालिका वंदनाताई पवार, सईताई पवार, गटनेता भास्कर पवार, नगरसेविका लक्ष्मी धुतमल, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण ,अविनाश पवार, पंकज परिहार ,हबीब नबीसाब शेख, तुकाराम दाढेल सतीश निखाते, राजेश बोडके, नारायण येल्लरवाड, रावसाहेब मंजलवाड, विलास कहाळेकर, सदानंद नेलंग, इरबा पवार, खविसं उपसभापती श्याम पाटील पवार माजी नगरसेवक बाबुभाई कुरेशी माजी सभापती आप्पाराव पवार माजी उपसभापती मारुती पाटील बोरगावकर, बी-डी-जाधव, संजय मुक्तेदार ,खंडू पवार, यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते

संस्थेतर्गत चालणाऱ्या शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, डॉ. याकुब खॉन उर्दू शाळेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला . माजी आ. रोहीदास चव्हाण व नगराध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी जिजाऊ जन्मोत्सव व उपक्रमाबद्दल सांगितली व जिजाऊ वंदना घेतली . संचलन बालाजी गवाले यांनी तर आभार मुख्याध्यापक एच जी पवार यांनी मानले.
. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर शहरातून भव्यदिव्य जिजाऊ प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली. लोहा शहरातील मुख्य रस्त्याने वाजतगाजत लेझीम ढोल ताशाचा गजर , जिजाऊ वेशभूषेत विद्यार्थीनी सहभाग राष्ट्रमाता याच्या तैलचित्रासह शहराच्या मुख्य रस्त्याने.मार्केट कमिटी दुसरी कमान बसस्थानक शिवकल्याण नगर माऊली नगर मार्गे शाळेत विसर्जित झाली .
आयोजक संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पवार, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे, मुख्याध्यापक (प्रा) एच. जी. पवार उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलतान खान , तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.मिरवणूक काळात शहरातील वेगवेगळ्या संस्था आणि नागरीकांनी विद्यार्थ्यांना खाऊ व पाणी वाटप केले.

