हिमायतनगर (अनिल मादसवार) मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या पहिल्या मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ च्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनानिमित्त, पुढील वर्षी म्हणजेच २०२७ साली नूतन पत्रकार भवनात दर्पण दिन व भव्य पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन हिमायतनगर नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रफिक सेठ (शेख रफिक शेख महेबूब) यांनी दिले.
दर्पण दिनानिमित्त मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०२ वाजता नगराध्यक्ष कार्यालय, हिमायतनगर (जि. नांदेड) येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा प्रमाणपत्र व पेन देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना दर्पण दिन व राष्ट्रीय मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष रफिक सेठ यांनी सांगितले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांना सन्मान व स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, यासाठी पुढील वर्षी नूतन पत्रकार भवनात अधिक व्यापक स्वरूपात दर्पण दिन साजरा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात पत्रकार बांधवांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारी अभ्यासपूर्ण भाषणे केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करताना, सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावे, बातम्यांची शहानिशा करून निर्भीडपणे समाजहिताच्या बातम्या प्रकाशित कराव्यात, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन सूर्यवंशी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल, नगरसेवक गजानन गुंडेवार, खालिद भाई, तसेच ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, त्रिरत्नकुमार भवरे,कानबा पोपलवार, गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार, दत्ता शिराने, सोपान बोंपीलवार, अशोक अनगुलवार, असद मौलाना, ज्ञानेश्वर पंदलवाड, सय्यद मन्नान, संजय मुनेश्वर, दिलीप शिंदे, मनोज पाटील, मारोती वाडेकर, संजय कवडे, पांडुरंग मिराशे, धम्मपाल मुनेश्वर, अनिल भोरे, नागेश शिंदे, दाऊ गाडगेवाड, आदी पत्रकार उपस्थित होते. याशिवाय शहर व ग्रामीण भागातील व्रत्तपत्र व सोशल मिडीया, युट्युब चैनेलचे पत्रकार, नूतन नगरसेवक, नगरसेवक प्रतिनिधी, काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनीफ सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय माने यांनी केले.
पत्रकार सन्मान सोहळ्याच्या प्रमाणपत्रावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांनी केली पहिली स्वाक्षरी
oplus_0
“पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तो करतो. पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पत्रकार सन्मान सोहळ्याच्या प्रमाणपत्रावर पहिली सही करण्याचा मान मला लाभला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.” दिनांक 8 रोजी होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी, आगमी काळात जनतेच्या हिताचे काम कामे करून शहराचा चेहरा बदलून टाकन्यासाठी सर्वांच्या सहकार्य हवं आहे असेही ते म्हणाले. — रफिक सेठ (शेख रफिक शेख महेबूब) लोकनियुक्त नगराध्यक्ष, हिमायतनगर
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.