नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सौजन्याने नांदेड शहरातील सोमेश काॅलणी परीसरातील दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी या दिव्यांग दांपत्याला दोन अपत्य असुन गत अनेक वर्षांपासून सोमेश काॅलणी परीसरात किरायाच्या घरात ते आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवत आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपन करतात. बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सुर्यवंशी यांनी दिव्यांग नेते राहुल साळवे यांच्यासोबत गत 2010 पासुन काम सुरू केले. महापालिकेकडील दिव्यांगांचा राखिव निधी खर्च व्हावा यासाठी गत 2015 पासुन विविध आक्रमक आंदोलने उपोषणे आणि मोर्चे काढले आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली.
दिव्यांगांच्या या आंदोलन व मोर्चाची दखल घेऊन 2016-2017 मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिका महापौर उपमहापौर निवडी दरम्यान एक महत्वपुर्ण बैठक आयोजित करून दिव्यांगांच्या राखिव निधी खर्चास सुरूवात करून दिली तो निधी खर्च करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीच्या माध्यमातून हक्काच्या घरकुलासाठी दिव्यांगांनी तिवृ लढा उभारला. त्यानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रथम महानगरपालिका ज्यांनी दिव्यांगांना मोफत घरकूल देणारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हि ठरली तर कोरोना महामारीच्या काळात उपासमारी होऊ नये यासाठी नांदेड शहरातील शेकडो दिव्यांगांना दरमहा आर्थिक मदत देणारीही महापालिका नांदेड हि एकमेव महापालिका ठरली आहे.
स्वतः दिव्यांग असुन गत अनेक वर्षांपासून निस्वार्थ लढा लढणा-या दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी यांनी महापालिकेकडून नुकतेच स्वयंरोजगारासाठी देण्यात आलेल्या 5 टक्के राखीव निधितून आत्मनिर्भरतेचे प्रतिक म्हणून समाजापुढे एक आदर्श घडविला आहे. एरवी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन बेरोजगारी वाढविणा-यांसाठी सुर्यवंशी यांनी एक जिवंत उदाहरण म्हणून महानगरपालिका नांदेड समोर श्री साई दिव्यांग बेरोजगार टि स्टाॅल हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सौजन्याने उभारला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी शेकडो दिव्यांगांच्या हस्ते या टि स्टाॅलचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले आहे.
दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी यांनी आम्हाला आत्मनिर्भर करून दिल्याबद्दल मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे.अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम.दिव्यांग विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले यासह महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.