उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक बाबाराव बालाजी विश्वकर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय ग्रंथालयासाठी ३०००( तिन हजार) रूपये ची संस्कारक्षम पुस्तक ” ज्ञानाची शिदोरी” भेट देऊन पंचक्रोशीतील बिटमध्ये उल्लेखनीय उपक्रमांची चर्चा होताना दिसत आहे.
कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिराढोण ता. कंधार या शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील साहित्यिक व उपक्रमशील आणि आदर्श शिक्षक बाबाराव बालाजी विश्वकर्मा यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३००० रूपयांची संस्कारक्षम पुस्तके ‘ज्ञानाची शिदोरी ‘ या उपक्रमांतर्गत शाळेला भेट दिलेली आहेत.
जि.प.कें.प्रा.शा.शिराढोण ता कंधार या शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. सप्टेंबर महिन्यात साने गुरुजी शतकपूर्ती महोत्सवा निमित्त साने गुरुजीं लिखीत ‘श्यामची आई ‘ या पुस्तकातील कथांचे अनुवाचन करत ४२ दिवस हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनतर आज वाढदिवसाचे औचित्य साधून बाबाराव विश्वकर्मा सरांनी साने गुरुजी शालेय बाल वाचनालयासाठी ३००० रूपयांची संस्कारक्षम पुस्तके शिराढोण केंद्रांचे केंद्र प्रमुख श्री, प्रवीण पाटील व केंद्रीय मुख्याध्यापिका सौ. तारा मठपती यांच्याकडे सुपूर्द करत ‘ज्ञानाची शिदोरी’ या उपक्रमांची अंमलबजावणी ला सुरूवात केली. त्यासह विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून अतिशय उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील शिक्षक मधुकर कारामुंगे, विकास राठोड, सौ.अनिता पचलिंग, सौ. सविता बिजमवार, सौ.राखी लव्हेकर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आदर्श शिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांचा वाढदिवस अन्य ठिकाणी साजरा करून निराकरण पैसा खर्च केला असता. पण हा खर्च टाळून विश्वकर्मा परिवारांनी चांगला निर्णय घेऊन उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाची गरज आहे.म्हणून ग्रंथालयासाठी दिलेली रक्कम नक्कीच विद्यार्थीचे भाग्य उजळण्यासाठी हिताचे होणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय उपक्रमांची इतरांनी प्रेरणा घ्यावी अशी चर्चा होताना दिसत आहे