HomeकरियरThe number of 'one lakh Maratha' entrepreneurs is complete | 'एक लाख...

The number of ‘one lakh Maratha’ entrepreneurs is complete | ‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण – NNL

नांदेड| अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख उद्योजकांची संख्या पूर्ण झाली आहे. मराठा समाजाला न्याय देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना अंतर्गत आजपर्यंत एक लक्ष 14 लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरित केले आहेत. त्यापैकी महामंडळांनी 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले.या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करून नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या महामंडळाचे अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली होती.

नरेंद्र पाटील यांनी शासनाचे विविध विभागाचे अधिकारी राष्ट्रीयकृत्व सहकारी बँकांचे प्रमुख महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लाभार्थी तसेच अन्य संबंधितांनी या योजनेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातील कार्यालय असून मराठा समाजातील युवकांनी आपला नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत मदत घ्यावी असे आवाहन महामंडळाचे स्थानिक समन्वयक शुभम शेवणकर यांनी केले आहे. नांदेड जिल्हयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित कार्यालय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उज्वल गॅस एजन्सी समोर, शासकीय तांत्रिक विद्यालय बाबानगर येथे आहे.

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments