HomeकरियरSupplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये...

Supplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल -NNL

नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा 16 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

तथापि 26 जुलै 2024 रोजी राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सहसचिव मेधा निरफराके यांनी केले आहे.

इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते 1 वाजता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 (72-2) या विषयाची परीक्षा बुधवार 31 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत होणार आहे. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी होणारी सकाळ सत्र 11 ते 2 या कालावधीत होणारी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान तसेच एम.सी.व्ही.सी पेपर-2 या विषयाची परीक्षा शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळ सत्रात 11 ते 2 या कालावधीत होईल.

तसेच इयत्ता 10 व 12 वी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बदलाची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असेही राज्य मंडळ, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments