किनवट,परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या नांदेड उत्तरच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेशराव सोळंके पाटील रा. किनवट यांची प्रदेश अध्यक्ष गिरीश जाधव यांनी निवड करून त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले आहे. निवड झाल्या बद्दल त्यांचेवर समाज बांधवातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी धानोराचे संस्थापक सुरेशराव सोळंके पाटील यांचे संस्थेच्या माध्यमाध्यमातून समाज कार्याचे काम चालुच आहे. त्या सोबतच कुणबी मराठा समाजातील जनतेसाठी ही त्यांचे कार्य नेहमीच चालु असते. या सर्व कार्याची दखल घेवून महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या नांदेड उत्तरच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेशराव सोळंके पाटील यांची निवड प्रदेश अध्यक्ष गिरीश जाधव यांनी करून त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी राज्य सचिव व्यंकटराव जाधव, राज्य कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष आर. बी. काकडे, कोषाध्यक्ष संजय कदम, कार्यकारणी सदस्य सुखदेव जाधव सह इतर समाज बांधव ही उपस्थित होते. सुरेशराव सोळंके पाटील यांची नांदेड उत्तरच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यामुळे संघटनेचे किनवट तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सतीश पाटील, वडजे सर, दत्ता नरवाडे, अक्षय पावडे, शेखर गावंडे, अजय कदम यांच्यासह समाज बांधवाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.