HomeनांदेडThe high pressure power line in Taroda area should be removed |...

The high pressure power line in Taroda area should be removed | तरोडा भागातील उच्चदाब विद्युत वाहिनी काढण्यासाठी नागरिकांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन – NNL

नांदेड| शहरातील जगमवाडी येथून निघालेली लाईन छत्रपती शाहू महाराज चौक, उल्हासनगर, पाटबंधारे नगर,जेतवन नगर, वैशाली नगर,तरोडा बु. व खु.ते सांगवी भागातील दाट लोकवस्तीतून गेलेली उच्चदाब विद्युत वाहिनी नवीन लिंक लाईन कॅनाल रोड ने टाकण्यात यावी यासाठी या भागातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आज दि. 22 जुलै 2024 रोजी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता डोये साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता जाधव साहेब यांचीही यावेळी उपस्थिती होती.

नांदेड शहरातील तरोडा बु. व खु. भागातून 33 के.व्ही. ची वीज वाहिनी गेली असून पूर्वी या भागात विरळ वस्ती असल्यामुळे त्याचे कोणालाही काही वाटत नव्हते. परंतु आता या भागात वस्ती वाढ होऊन यापासून अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे व या वीज वाहिनीमुळे आतापर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत. त्याबाबत वेळोवेळी या भागातील नागरिकांनी संबंधितांशी पत्रव्यवहार करुन सदर वीज वाहिनी हलवण्याची मागणी केली. परंतु याकडे लोकप्रतिनिधीसह महावितरणच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सदर काम थंड बस्त्यात पडून राहिले.

यंदाच्या उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर तेजाने सदर तारा प्रसारण पावून अनेकांच्या घराला चिटकण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात आणखी उष्णता वाढली तर सदर तारा घरांना चिटकून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आता सजग झाले असून सदर तारा कॅनॉल रोडने काढण्याच्या मागणीकरीता लोकप्रतिनिधींसह महावितरण अधिकार्यांच्या भेटीगाठी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याकरीता प्रयत्न करत आहेत. त्यास लोकप्रतिनिधींसह महावितरणचे अधिकारीही सकारात्मक प्रतिसाद देत असल्यामुळे सदर वीज वाहिनी लवकरच निघण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे या भागातील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आज महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन देताना आनंदराव गायकवाड, एस.पी. राखे, तुकाराम अटकोरे, चंद्रकांत रावणगावकर, किशनराव ढवळे, पापुलवार, ढवळे, अ‍ॅड. मिलींद कदम, तुकाराम कांबळे, सुनील बेंद्रीकर आदींची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments