Tuesday, June 30

Tag: Citizens’ representation to Chief Engineer

The high pressure power line in Taroda area should be removed | तरोडा भागातील उच्चदाब विद्युत वाहिनी काढण्यासाठी नागरिकांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन – NNL

The high pressure power line in Taroda area should be removed | तरोडा भागातील उच्चदाब विद्युत वाहिनी काढण्यासाठी नागरिकांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शहरातील जगमवाडी येथून निघालेली लाईन छत्रपती शाहू महाराज चौक, उल्हासनगर, पाटबंधारे नगर,जेतवन नगर, वैशाली नगर,तरोडा बु. व खु.ते सांगवी भागातील दाट लोकवस्तीतून गेलेली उच्चदाब विद्युत वाहिनी नवीन लिंक लाईन कॅनाल रोड ने टाकण्यात यावी यासाठी या भागातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आज दि. 22 जुलै 2024 रोजी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता डोये साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता जाधव साहेब यांचीही यावेळी उपस्थिती होती. नांदेड शहरातील तरोडा बु. व खु. भागातून 33 के.व्ही. ची वीज वाहिनी गेली असून पूर्वी या भागात विरळ वस्ती असल्यामुळे त्याचे कोणालाही काही वाटत नव्हते. परंतु आता या भागात वस्ती वाढ होऊन यापासून अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे व या वीज वाहिनीमुळे आतापर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत. त्याबाबत वेळोवेळी या भागातील नागरिकांनी संबंधितां...
error: Content is protected !!