Homeनांदेडfarmers in agriculture school at Usmannagar | उस्माननगर येथे शेती शाळेत शेतकऱ्यांचा...

farmers in agriculture school at Usmannagar | उस्माननगर येथे शेती शाळेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथे शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन पिकाची शेती शाळा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदरील शेती शाळेत तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते यांची प्रमुख उपस्थिती होती .

उस्माननगर येथे शेतीशाळेत श्री श्रीराम वारकड कृषी पर्यवेक्षक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील लागवड पद्धती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले व तालुका कृषी अधिकारी श्री विठ्ठल गीते यांनी सोयाबीन पिकांमधील अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणारा पिवळेपणा त्यावरील उपाय योजना ग्रेड दोन सूक्ष्म मूलद्रव्यांची 5 ml प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करण्यासाठी मार्गदर्शन केले .

तसेच सोयाबीन पिकातील विविध किडी जसे खोडमाशी, चक्रीभुंगा, उंटअळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी विविध किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या व सोपान उबाळे कृषी सहायक उस्मान नगर यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार प्रदर्शन करून शेती शाळा संपन्न झाली . या शेती शाळेस पोलीस पाटील श्री विश्वंभर मोरे , अनंत घोरबांड , मारोती वारकड, गणेश शिंदे, राम मोरे , नागनाथ वारकड, संतोष शेकापूरे, शिवराज वारकड नयुम शेख व गावातील इतर शेतकरी बांधव उपस्थित होते .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments