नांदेड| मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात नामांतर काळासारखी स्थिती निर्माण झाली असून, समाजात शांतता व सलोखा रहावा .यासाठी वंचित बहुजन आघडीच्या वतीने आगामी काळात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे फारुख अहेमद, ऍड. अविनाश भोसीकर, शिवा नरंगले, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अॅड आंबेडकर म्हणाले की, सध्या आरक्षणावरून उद्भवलेली परिस्थिती चांगली नाही. कोणतेही राजकीय पक्ष आपली भूमीका मांडायला तयार नाहीत. सध्याचे सरकार कोपर्डी, मराठा आरक्षण या विषयावरुन लोकांना वाऱ्यांना सोडतांना दिसत आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी शांतता व समाजात सलोखा अबाधीत राहण्यासाठी व आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करत आहे.

वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने सर्व ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन २५ जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला मुंबई येथील चैत्यभूमी, पुणे येथील फुले वाडा तर २६ रोजी आरक्षणाची घोषणा केलेला महत्वाचा दिवस असून, कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. २७ रोजी ही यात्रा सांगोला, पंढरपूर, मोहळ, सोलापूर येथे असणार आहे. त्यानंतर ही आरक्षण बचाव यात्रा मराठवाडा, विदर्भ पुन्हा मराठवाडा येथे येणार आहे.


आरक्षण बचाव यात्रेची सांगता ७ किंवा ८ ऑगस्ट रोजी जाहीर सभा घेवून औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षण बचाव यात्रा म्हणजे कोणत्या जातीच्या विरोधात नाही तर आरक्षणाची संकल्पना संपू नये यासाठी काढण्यात येणार आहे. महायुतीवर टीका करतांना ते म्हणाले की, सध्याचे राज्य सरकार मनुवादी सरकार आहे. त्यांनी मुला मुलींमध्ये भेद करायला सुरुवात केली आहे. एकीकडे लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून दहावी पास उत्तीर्ण तरुणाला सहा हजार रुपये तर दहावी पास असलेल्या तरुणींना दीड हजार रुपये जाहीर केले आहेत. या सरकारमध्ये घबरहाट झाल्यामुळे मतदारांना योजनेच्या स्वरुपात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे.


विशाळगडाच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मौलवींनी फतवा काढून शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेसला या महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता मौलवींनी या पक्षांच्या प्रमुखांना भेटायला हवे. मुस्लिम बांधवांनी याबाबत चर्चा करून आगामी निवडणुकीत आम्ही तुमचे ऐकणार नाही असे सांगावे, महाविकास आघाडीच्या व वंचित बहुजन आघाडीच्या युती संदभनि बोलतांना ते म्हणाले की, महायुतीतील श्रीमंत पक्षाचे नेते गरीबाला सोबत घेत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
नदिड विधान परिषद निवडणुकीत मते फुटलेल्या काँग्रेसच्या सात आमदारांवर कारवाई करणे चुकीचे असल्याचे मत वंचित बहुजन आपाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नांदेड येथे व्यक्त केले. या विधान परिषद निवडणुकीत मते फुटलेल्या आमदारांवर कारवाई केल्या जात आहे. परंतु मागील निवडणुकीत भीमशक्तीचे चंद्रकांत हंडोरे यांना पाडणाऱ्या आमदारांची नावे माहिती असतानाही त्यांच्यावर कारवाई न करणे म्हणजे काँग्रेसमधील मनुवाद समोर आल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पक्षाच्या कार्यकत्यांशी नवीन कोठा भागातील सप्तगिरी प्लाझा येथे संवाद साधला. यावेळी कार्यकत्यांकडून त्यांनी विधानसभानिहाय माहिती घेतली. त्यापूर्वी विश्रामगृह येथे वार्ताहरांशी संवाद साधतांना विधान परिषद निवडणुकीसंदभनि भाष्य करत काँग्रेसवर टीका केली. मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्यात, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. विशाळगडाच्या प्रनावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र कोण्या दिशेने चालला आहे, हे मला विचारण्यापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्षातील नेत्यांना विचारावे. कारण लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना मते दिली आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

