नांदेड| येथील हनुमान गड परिसर व गोविंदनगर भागात युवा नेते डॉ. विश्वास कदम यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या सोयीसाठी लाडकी बहीण व राशन कार्ड नोंदणी शिबिर आणि नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
.खा.वसंतराव चव्हाण व कॉंग्रेस चे जेष्ठ नेते बि.आर.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक तथा युवा नेते माश्री विश्वासराव कदम यांनी त्यांच्या डॉ विश्वासराव कदम विचार मंच च्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन मतदार नोंदणी,लाडकी बहीण योजना व राशन कार्ड यासाठी उत्तर विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात येत आहे.
त्यानुसार १९ जुलै रोजी दिवसभरात प्रभाग ३ व ४ येथे साहिल शेख व उद्भव लांडगे यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मा.उपमहापौर आनंद चव्हाण व माजी सनदी अधिकारी श्री एकनाथराव मोरे यांनी भेट देऊन पाहणी केले व नोंदणी अभियान शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला.असल्याची माहीती डॉ. विश्वास कदम यांनी यावेळी दिली.