HomeनांदेडHoly Shravana Mass | पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) श्री परमेश्वर मंदिरात...

Holy Shravana Mass | पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन – NNL

२१ दिवसात संगीतमय शिवपुराण कथा, ज्ञानेश्वरी भावकथा आणि भागवत कथेचे आयोजन

हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान वाढोणा (हिमायतनगर) च्या वतीने पवित्र श्रावण मासानिमित्त येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या २१ दिवस कालावधीत संगीतमय भागवत कथा, ज्ञानेश्वरी भावकथा आणि संगीतमय भागवत कथा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. याची सुरुवात संगीतमय शिवपुराण कथेने दि.07 ऑगस्ट बुधवार पासून होणार आहे. शिवपुराण कथेचे प्रवचन हभप. भागवताचार्य विदर्भ केशरी स्वामी सारंग चैतन्यजी महाराज रा. अमरावती यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. भगवान शिवशंकर भोलेनाथांच्या विविध लीला आणि त्यांचे झाकीच्या स्वरूपात दर्शन उपस्थितांना घडविले जाणार आहे. शिवपुराण कथा सोहळा संपताच दि.१४ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसादाव्या पंगतीने समारोप केला जाणार आहे.

तर भव्य संगीतमय ज्ञानेश्वरी भावकथेची सुरुवात दि.१६ ऑगस्ट रोज शुक्रवारी होणार असून, कथेचं व्यासपीठ हभप अर्जुन महाराज खडे रा.आळंदी यांच्या मधुर वाणीत संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा उपस्थित भाविकांना सांगितली जाणार असून, यातून विठू माऊलींचे दर्शन तसेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम… आदींचे झाकीच्या माध्यमातून उपस्थित भाविक भक्तांना दर्शन घडणार आहे. या कथेचा समारोप दि.२३ ऑगस्ट रोजी शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जाणार आहे.

त्यानंतर दि. २४ पासून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, भागवत कथेचे प्रवक्ता हभप.भागवताचार्य कु.वैष्णवी दीदी गोड, सोनखेडकर यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. यातून भगवान श्रकृष्ण लीलांचे दर्शन उपस्थित भाविकांना घडणार आहे. या कथेचा समारोप दि.३१ ऑगस्ट रोजी शनिवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. तीनही धार्मिक प्रवचन व संगीत कथा श्रवण कार्यक्रम येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दररोज दुपारी ०२ ते ०५ वाजेपर्यंत चालणार आहेत. दरम्यान कथेचं ध्वनी व्यवस्थापन माऊली सांऊड सिस्टीम, डोल्हारी हे करणार असून, पवित्र श्रावण मासात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ शहरासह पंचक्रोशीतील भाविक – भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, यांच्यासह सर्व संचालक मंडळींनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments