Homeनांदेड5 rupees for milk and 30 rupees for milk powder export |...

5 rupees for milk and 30 rupees for milk powder export | दुधासाठी पाच रुपये तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये अनुदान – NNL

नांदेड| राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. यात दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान शासनाने जाहीर केले आहे.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना कार्यरत खाजगी दुध प्रकल्प व फार्मर प्रोडयुसर कंपनी यांच्याकडे दुधाचा पुरवठा करणे बंधनकारक राहील. गाईच्या 3.5/8.5 गुण प्रतीला 30 रुपये देणे बंधनकारक राहील. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय टॅगिंग, मोबाईल नंबर बँक खाते इ. दुध पुरवठा करणाऱ्या खाजगी दुध प्रकल्पाकडे लॉगीन करावे. ही योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीपर्यत राहील यांची नोंद दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. एस.एस. बळवंतकर यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments