Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग – ६ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
नांदेड लेख July 11, 2024

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग – ६ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी सर्व यात्रेकंरू रात्री १ वाजता स्नान करून तयार झाले होते. पूर्वी अमरनाथ येथे राहण्याची व्यवस्था होती.परंतु तीन वर्षांपूर्वी अमरनाथ गुफे जवळील सर्व टेन्ट वाहून गेल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हापासून अमरनाथ ला गुफे जवळ कोणालाच राहू दिले जात नाही. त्यामुळे एकाच दिवसात दर्शन घेऊन परत यावे लागते. म्हणून मी सर्वांना कंपल्सरी डोली अथवा घोडा करण्यास सांगितले होते.३२ यात्रेकरूंनी डोली केली तर ५५ जण घोड्यावर स्वार झाले.तिघे जन हट्ट धरून पायी गेले.
ठीक ३ वाजता कुडकुडत्या थंडीत लाईनीमध्ये उभे राहिलो. साडेचारला गेट उघडल्यानंतर अमरनाथ दर्शनासाठी मोठ्या उत्साहात व जल्लोषात बम बम भोलेच्या गजरात रवाना झालो.

बालटाल येथून गुफेपर्यंतचे अंतर १४ किलोमीटर आहे. डूमेल गेटवर सर्वांच्या आरएफआयडी कार्डची तसेच यात्रा परचीची तपासणी होते. त्यामुळे डोली व घोड्यावर बसलेल्यांना खाली उतरून रांगेत उभे रहावे लागते. गेटच्या बाहेर घोडेवाले आणि डोली वाले आमची वाट पाहत थांबलेले होते. गर्दी इतकी जास्त होती.सगळे घोडे वाले सारखेच दिसत होते.आम्ही त्यांना ओळखू शकत नव्हतो. आम्ही सर्वांनी अमरनाथ यात्री संघाचे टी-शर्ट व टोपी घातलेली असल्यामुळे घोड्या वाल्यांनी आम्हाला बरोबर ओळखले. घोड्यावर बसून आम्ही परत चढाई सुरू केली. रेल पथरी, बरारी मार्ग, संगम या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊन आमचा प्रवास सुरू झाला.एका बाजूने उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूने खोल दरीतून खाली अमरगंगा वेगाने वाहत असलेले दृश्य नवीन व्यक्तीच्या हृदयात भीती निर्माण करते. यावेळी दरीच्या बाजूने संपूर्ण बॅरिकेटिंग झाले असल्यामुळे सुरक्षित वाटत होते.

सकाळी दहा वाजता अमरनाथ गुफेपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडा स्टैंड वर आम्हाला थांबवले. तिथून पुढे पायी अंतर कापावे लागले. काही जणांना हे अंतर चढताना दम लागत होता. म्हणून त्यांनी अठराशे रुपये प्रत्येकी देऊन डोली केली. अमरनाथच्या पायऱ्या एकदम छातीवर आहेत. त्या ठिकाणी सर्वांची कडक तपासणी करण्यात येते. मोबाईल व इतर वस्तू जमा करावे लागतात. आमच्या सोबत असणाऱ्या सुभाष वलबे यांची एका मिलिटरी वाल्याची सोबत ओळख निघाल्यामुळे काहीजणांना रांगेत उभे टाकावे लागले नाही. डोलीवर आलेल्यांना वरपर्यंत जाऊ दिल्या जाते.अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचे भरपूर वेळ दर्शन झाल्यामुळे मन प्रसन्न झाले. शिवलीला अमृताच्या नित्य पठनाच्या ४२ ओव्या आणि ओम नमः शिवाय चा जप केला.माझ्या गळ्यात १०८ स्फटिकाची माळ असून त्यात एक मुखी आणि गणेश मुखी ओरिजनल रुद्राक्ष लावलेले आहेत.पंडितजी सांगून ती माळ शिवलिंगाच्या समोर टेकविली. गुहेमध्ये कबुतराची जोडी दिसल्यामुळे सर्वजण खुश झाले.

प्रसन्न वातावरणात खाली उतरलो.माहिती कक्षातून अनाउन्समेंट केली की, ” माझे दर्शन झाले असून मी बालटाल कडे परत जात आहे. ज्यांचे ज्यांचे दर्शन झाले असतील त्यांनी इतरांची वाट न पाहता लंगर मध्ये थोडेसे खाऊन बालटाल कडे परत जावे.” गुहे पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोड्याच्या स्टॅन्ड कडे पायी चालत आलो. दुपारी एक च्या सुमारास आम्ही घोड्यावरून परत जाण्यास निघालो. गुफे कडे पाहून भोलेनाथाला नमस्कार केला व परत येण्याची संधी मिळू दे अशी प्रार्थना केली. माझ्या सोबत चार बॅनर होते. त्यावर मजकूर लिहिलेला होता की, भारतीय जनता पक्षातर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत. मोदीजींचा, खा. अशोक चव्हाण, माजी खासदार चिखलीकर,खा. डॉ. अजित गोपछडे, संजय कोडगे आणि तिन्ही जिल्हाध्यक्षांचा व माझा त्यावर फोटो छापलेला होता.घोडेवाल्याच्या मदतीने मी रस्त्यात योग्य ठिकाणी बॅनर बांधले.

खाली उतरत असताना धूळ फार मोठ्या प्रमाणात उडत होती. त्यामुळे मास्क लावणे आवश्यक होते. बर्डी टॉप इथे लंगरमध्ये चहा घेऊन बालटाल बेस कॅम्प ला सायंकाळी ४ वाजता पोहोचलो. किती यात्री टेन्ट मध्ये परत आले याची चौकशी केली. डोलीवर गेलेले सर्व जण दोन वाजताच परत आले होते. मसाज वाल्याला बोलवून मस्तपैकी मालीश केली आणि गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केल्यामुळे थकवा दूर झाला. यावर्षीच्या प्रवासातील अत्यंत समाधान देणारी बाब म्हणजे यावर्षी आमच्यापैकी एकालाही कुठलीच शारीरिक व वैद्यकीय अडचण न उद्भवता खूप छानपणे बाबा अमरनाथचे दर्शन झाले.

निसर्गाने देखील छान साथ दिली. आकाश निरभ्र असल्याने आणि वातावरणात हलकासा गारवा असल्यामुळे यात्रेकरूंना कुठलाच त्रास झाला नाही. पायी गेलेले तिघे सोडून बाकी सर्वजण सात वाजेपर्यंत परत आले होते. आमच्या सोबत असणाऱ्या डॉ. स्नेहाराणी व डॉ.महेश बिरादार या जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आज होता. आम्ही त्यांचे परत एकदा विधीवत लग्न लावले. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक काश्मिरी लोकं सुद्धा येऊन उभे राहिले. बहारो फुल बरसाओ, वरात, अंतरपाठ, पाच मंगलाष्टका, अक्षदा व वरमाला असा सर्व योग जुळून आल्यामुळे हा सोहळा संस्मरणीय झाला. भटजीची भूमिका बलभीम पत्की यांनी तर वधू-वरांच्या मामांची भूमिका रामेश्वर वाघमारे व बालाजी जाधव यांनी व्यवस्थित पार पाडली. लंगर मध्ये विविध खाद्यपदार्थ चा आस्वाद घेतल्यानंतर टेन्ट मध्ये पडल्या पडल्या झोप लागली.      …(क्रमश:)

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur From Amarnath Cave Part - 6
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAmarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL
Next Article martyr jawan Kamesh Kadam | शहीद जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

AIDS Prevention : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

July 3, 2025

Tree plantation : महसूल सप्ताहानिमित्त सिध्दनाथ येथे वृक्षारोपण

August 9, 2025

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘राष्ट्रीय सेवा’ योजनेतून समाज उपयोगी कामे करावीत – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

September 5, 2024

Dr.Ravindra Singal’s birthday : डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर -NNL

September 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Malegaon crowd stamped the popularity of Shankarpata : शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब -NNL

local crime branch : स्थानिक गुन्हे शाखेने रु. ३४ हजार ६५०/- चा सुगंधीत गुटखा केला जप्त -NNL

Reservation : हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर — महिलांचा दबदबा!

Expenditure Inspectors Inspection ; खर्च निरीक्षकांकडून जिल्ह्यातील विभाग प्रमुखांचा आढावा एसएसटी, एफएसटी, सी-व्हिजील, एमसीएमसीच्या कामकाजाची पाहणी – NNL

With artificial intelligence | महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?