क्राईमनांदेड

Himayatnagar Crime | हिमायतनगर शहरातील जुगार अड्ड्यावर स्थागुशाची धाड; 5 लोकांवर गुन्हा दाखल – NNL

हिमायतनगर। पोलीस ठाण्याचा कारभार नांदेड येथुन आलेले नूतन अधिकारी अमोल भगत यांनी स्वीकारला आहे. त्याचनि दाखल होताच शहरात सुरु असलेल्या अवैध कारभाराला लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. कार्यवाहिचा बडगा उगारत स्थागुशाच्या मदतीने बोरगडी रस्त्यावर चालणाऱ्या एका जुगार अड्डय़ावर छापा टाकून 7 जुगार्याना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी पाच जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहर व परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हिमायतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध कारभारावर जरब बसवून कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक अमोल भागात यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर शहरात अवैध धंद्यानी थैमान घातले असून, मागील काही महिण्यापासून जुगार अड्डे, देशी विदेश दारूची विनापरवाना विक्री, मटका, गुटखा, यासह अन्य अवैध धंदे तर बिनदिक्कत पणे चालूच आहेत. तसेच मुख्य रस्त्याने धूम स्टाईलने दुचाक्या चालविणे, फटका बुलेट स्वर, आणि काही टारगट मुलांकडून होत असलेली महिला – मुलींची छेडछाड यासह शहरात गँगवॉर सारखे प्रकरणे घडू लागली आहेत. त्यामुळे येथे कर्तव्यकठोर अधिकारी देऊन हिमायतनगर शहराला शिस्त लावावी आणि अवैद्य धंद्याचे उच्चाटन करावे अशी मागणी महिला मंडळी व सुजाण पालकातून केली जात होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घडलेल्या घटनेची गंभीर नोंद घेवून हिमायतनगर ठाण्याला अमोल भगत यांच्या रूपाने नवतरुण अधिकारी दिला आहे. ठाण्याचा चार्ज घेताच त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. शहरातील बोरगडी रस्त्यावर चालत असलेल्या एका जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पोलीसांनी छापा टाकून 7 जुगार्याना, मोबाईल, जुगाराचे साहित्य, नगदी रकम 13 हजार 700 रुपय असा एकूण 59 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. हि कारवाई दि.९ मंगळवारी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान बोरगडी रस्त्यावरील दक्षिण मुखी टिन पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळताना करण्यात आली आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्यादी पोलीस जमादार हनुमंत राव रघुनाथ पोतदार यांच्या फिर्यादीवरून 5 जणांवर कलम 12 मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अवैद्य धंद्यांना लगाम लागेल अशी रास्त अपेक्षा शहरातील सुजाण नागरिकांना आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!