Homeनांदेडमराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

सरकारने दिलेले आश्वासन पाळावे - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील

नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दि. ८ जुलै रोजी नादेड शहरात सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तुन आरक्षण मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत जरांगे पाटील याना पाठिंबा देत एक मराठा… लाख मराठा… या घोषणां देत लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात दौरा सुरू आहे. आज हिंगोलीहून नांदेड शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर शहरातील राज कॉर्नर तरोडेकर चौक येथून या शांतता रॅलीला सुरूवात झाली. सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्जुन आरक्षण मिळावे. महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्यांसाठी निघालेली अभूतपूर्व रॅलीने राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिवा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय. टी.आय. चौक-शिवाजीनगर-एस.पी. ऑफीस चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरा सायंकाळी ५ वाचजा दाखल झाली. सादर रॅलीत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरला होता.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या तयारीसाठी गेल्या ८ दिवसापासून मराठा समाजाच्या कार्यकत्यांनी जय्यत तयारी केली होती. जिल्ह्याभरातून लाखोच्या संख्येने समाज बांधव रॅलीत सामील होण्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून नांदेड शहरामध्ये दाखल झाले. रॅलीतील लोकांना ठिकठिकाणी चहा फराळ जेवणाची व्यवस्था दानशूरांनकडुन करण्यात आली होती. शहराच्या सर्व बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने रॅली शांततेत पार पडावी यासाठी संपूर्ण तयारी करून जागोजागी प्रचंड बंदोवस्त लावला होता. तर काही मार्ग वाहतूकीसाठी वंद करण्यात आले होते.

IMG 20240708 WA0077 मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

दुपारी ३ वाजता निघालेली रॅली सायंकाळी उशिरा सुरूच होती. शहरामध्ये जवळपास संपूर्ण बाजारपेठ बंद दिसून आली. तर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांना सुट्टी देण्यात आली होती. शहरातील सर्वच रस्ते बंद अवस्थेत दिसून आले. अभूतपूर्व रॅलीचे नियोजन अखंड मराठा समाज बाधवांच्या वतीने स्वयंसेवकांनी केले. जिल्हा पोलीस दल जिल्हा प्रशासन यांनी शांतता रॅलीचे नियोजन चांगल्या प्रकारे लावल्यामुळे रॅलीत सामील होण्यासाठी नागरिकांना सुलभ झाले.

सरकारने दिलेले आश्वासन पाळावे – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील
सरकारने मला बदनाम करण्यासाठी ओबीसीची फौज उभी केली, परंतू समाज मला उघडे पडून देणार नाही. सरकारने आता कोणताही डाव न टाकता आणि आम्ही मुंबई येण्याची वाट न पाहता दिलेल्या आश्वासनानूसार मराठा समाजास आरक्षण जाहीर करावे. अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली. दिलेले आश्वासन शासनाने पाळले नाही तर राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करणार असून, उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते आम्ही ठरवू असा इशाराही जरांगे पाटील यांनी रैलीला संबोधत करताना दिला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात मनोज जरांगे पाटील सायंकाळी मराठा समाजास संबोधित केल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments