मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL
नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दि. ८ जुलै रोजी नादेड शहरात सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तुन आरक्षण मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत जरांगे पाटील याना पाठिंबा देत एक मराठा... लाख मराठा... या घोषणां देत लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात दौरा सुरू आहे. आज हिंगोलीहून नांदेड शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर शहरातील राज कॉर्नर तरोडेकर चौक येथून या शांतता रॅलीला सुरूवात झाली. सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्जुन आरक्षण मिळावे. महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्यांसाठी निघालेली अभूतपूर्व रॅलीने राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिवा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय. टी.आय. चौक-शिवाजीन...
