आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे| आगामी काळात विधानसभेची लगीनघाई लक्षात घेऊन निवडणूक कधी लागेल याचा नेम नसल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट तालुक्यात भेटीगाठीवर जोर दिला. व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली.


महाविकास आघाडीच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करत लोकसभा निवडणुकी दरम्यान रात्रंदिवस एक करत महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना किनवट माहूर मतदार संघातून अधिक मताची बेरीज जुळवत अधिक मताने लीड देऊन निवडून आणले,अशा या किनवट माहूर मतदार संघात मतदारांशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर शिवनी, कुपटी कोसमेट, कोल्हारी भिसी, पांगरी या गावांना भेटी देऊन मतदारांची संवाद साधत असता मोठ्या प्रमाणात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

माजी आमदार प्रदीप नाईक हे शिवणी येथे आले असता एक संयमी आणि विकासभिमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते त्यांच्या या कर्तुत्वगुणावर विश्वास ठेवून सेवानिवृत्त गणपत राठोड यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, कुंदन राठोड, गजानन सोळंके पाटील, येथील उपसरपंच संतोष जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख जब्बार भोजराज देशमुख, गणेश पाटील, शिवराम जाधव ,रोशन खान पठाण, ज्ञानेश्वर राऊतवाड, पेंटाजी कटलवार ,परमेश्वर यलकधरे, सरपंच कपिल आडे. नंदू गायकवाड, प्रीतम शेळके, मारुती जाधव ,शिवाजी बोटेवाड, श्याम साखरे, आनंद नंदनवार, श्रीराम राठोड, माजी सरपंच रुपसिंग राठोड. माजी सरपंच उत्तम राठोड, डॉक्टर गंगासागर मनोज राठोड ,बाळू शेरे ,जगदीश माने, प्रभाकर बोडेवाड, पिराजी घोगरवाड शुभम देशमुख सचितानंद देशमुख, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती होते.


माजी आमदार प्रदीप नाईक हे कोल्हारी भिसी येथे गेले असता त्यांनी प्रथम बाळूमामा मंदिरात जाऊन बाळूमामा यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मतदारांशी संवाद साधत असताना भिसी येथील नागरिकांनी नाईक साहेब तुमच्या कार्यकाळातच आमच्या भिशी येथे अनेक विकास कामे झाली आहेत आता तर आमचे गाव विकास कामापासून कोसोदूर असल्याचे येथील नागरिकांनी सांगीतले असता माजी आमदार प्रदीप नाईक याप्रसंगी बोलताना म्हणाले की माझ्या कार्यकाळात मी कुठलाही भेदभाव न ठेवता प्रत्येक गावांना विकास कामाबाबत निधी उपलब्ध करून दिला आहे आणि प्रत्येक गावात विकास कामे झाली आहेत मी प्रमाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहे.


विधानसभा निवडणुकीत अधिक मतांनी विजयी करून तुमच्या विकास कामाबाबत तुमच्या मुलांच्या बेरोजगारी बाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत तसेच शाळा, आरोग्य, सिंचन, महागाई , घरकुल, असे तुमचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहे हे ध्यानात ठेवून आपण अवघ्या काही महिन्यावर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानातून पावले उचलायची आहेत.
या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आश्वासना शिवाय काहीच मिळाले नाही शेतकरी आत्महत्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढच् होताना दिसुन येत आहे. त्यासाठी देखील आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची निवडणूक म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मतदार बंधूंना केले आहे. इस्लापूर येथील जय सेवालाल कृषी सेवा केंद्र येथे नाईक यांनी भेट दिली असता संचालक प्रमोद राठोड यांनी शाल श्रीफळ नारळ देऊन सत्कार केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



