नांदेड। येथील तरोडा खु. भागातील राधिका नगर येथील कंम्प्लेट पेस्ट कंट्रोल चे संचालक श्री चंद्रकांत कल्णाणकर यांना ३ जुलै रोजी नाशिक येथे मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील उद्यमशिल उद्योजकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.


कंम्प्लेट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट श्री चंद्रकांत देशमुख हे गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत, ते सांगतात की, घरात पेस्ट कंट्रोल नेहमीच आवश्यक आहे. शहरांत गटार किंवा पाइपच्या मार्गाने जीवजंतू घरात प्रवेश करतात आणि त्यांचा जर योग्य पद्धतीने बंदोबस्त केला नाहीत, तर ते तिथेच राहून आपला डेरा जमवतात.


नेहमीच असे चित्र दिसते की, बहुतेक घरांमध्ये रात्री उष्टी-खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवली जातात. झुरळे किंवा इतर जीव त्या भांडयांवर फिरून मग स्वच्छ भांडयांवर फिरतात. अशा वेळी अनेक आजार उदा. डायरिया, डिसेंट्री, अस्थमा इ. आगंतुक पाहुण्यासारखे हजर होतात. पेस्ट कंट्रोलमुळे ते सर्व जीवजंतू मरून जातात.


गावांमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरते. याउलट शहरांत गटारांमध्ये पाणी साठून राहाते. त्यामुळे झुरळे, डास व माश्यांची पैदास होते. म्हणूनच पेस्ट कंट्रोल दर तीन महिन्यांनी करणे आवश्यक आहे. जर झुरळे जास्त झाली असतील, तर ३० दिवसांत एकदा पेस्ट कंट्रोल करावे जेणेकरून त्यांची अंडी नष्ट होतील असे आवाहन ते करतात.

आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करतांना त्यांनी प्लायवुड विक्रेते, आर्क्टीटेक्चरर्स, कारपेंटर यांच्यासह त्यांच्या असंख्य ग्राहकांचे आभार मानले आहेत त्यांच्या यशाबद्दल सर्वत्रच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


