Homeनांदेडवाढदिवसाची मिळाली बहुमूल्य भेट..शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार...

वाढदिवसाची मिळाली बहुमूल्य भेट..शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर -NNL

नांदेड। गडगा, तालुका नायगाव येथील सुपुत्र शिवाजी नागोराव पन्नासे हे तरुणांचे आशास्थान आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचा वाढदिवस‌. हा वाढदिवस नायगाव तालुक्यात विविध भागात धुमधडाक्यात विविध कार्यक्रमानी साजरा होणार आहे. वाढदिवसाच्या शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

लहानपणापासून धार्मिक व सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळे जनसामान्यात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. लहानपणी परळी वैद्यनाथ येथे श्रावण महिन्यात राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे अनुष्ठान व ग्रंथराज परमरहस्य पारायण भजन कीर्तन सोहळा होता. त्यावेळी काशी जगद्गुरु अनेक शिवाचार्य व कै.खासदार केशरकाकु क्षिरसागर यांच्या हस्ते उत्कृष्ट गायक पुरस्कार मिळाला होता.  गेल्या एकोणतीस वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे.

आतापर्यंत 54 डोळ्याचे शिबिर आयोजित करून मोफत मोतीबिंदू शिबिर घेऊन त्यामध्ये 5009 रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत औषधी, डोळ्याचे ड्राॅप वाटप केले आहे. गडगा येथुन जाणाऱ्या प्रत्येक पायी दिंडीला नाष्टा किंवा जेवण देण्यात येते. गेल्या सतरा वर्षांपासून चापोली ते कपिलधार पायी दिंडीत यात्रेकरूंना मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप केले ‌आहे.

IMG 20240704 WA0048 वाढदिवसाची मिळाली बहुमूल्य भेट..शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर -NNL

त्यांच्या औषध दुकानासमोर थंड पाणीपोई दरवर्षी चालू असते. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा सतत अकरा वर्षे साजरा केला. तो कार्यक्रम तीन दिवस असायचा .पहिल्या दिवशी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दुसऱ्या दिवशी लर्निग लायसन्स कॅंम्प व रक्तदान शिबीर, तिसऱ्या दिवशी भव्य शोभायात्रा, व्याख्यानमाला व गुरुवर्याचा अभिष्टचिंतन सोहळा असे कार्यक्रम असायचे. नांदेड येथील तज्ञ डॉक्टर मंडळींना बोलावून पाच गावात सर्व रोगनिदान शिबिर व औषधी वाटप करण्यात आले.

आता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा समन्वयक डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा जिल्हा कक्ष प्रमुख असल्याने किडनी ट्रान्सप्लांट, ऱ्हदयरोग शस्त्रक्रिया यांसारख्या अनेक शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सतरा लाख रुपये निधी मंजूर करून दिला व पेशंटला कुठल्याही दवाखान्यात काही अडचणी असल्यास ताबडतोब ती अडचणी दूर केली जाते. कोविड काळात दोनशे कुटुंबाला भाजीपाला वाटप, नायगाव तालुक्यातील सर्व बॅंक, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन येथे मोफत मास्क,सॅनिटायझर,वाटप करण्यात आले.

तसेच लग्नाचा २५ वा वाढदिवस नायगाव येथील दोन कोविड सेंटर मध्ये मास्क,सॅनिटायझर, बिस्कीट,हॅन्डवाॅश मोफत वाटप करुन साजरा करण्यात आला.असे अनेक सामाजिक उपक्रम सतत राबविण्यात येतात.आतापर्यंत पाच पेशंटला मोठी ऑक्सिजन मशिन मोफत वापरायला देण्यात आली.शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा मार्फत आतापर्यंत सतरा मंदिर परिसरात व स्मशानभूमीत, शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले ते केवळ फोटो घेण्यापुरते नाही, तर त्याच संगोपन करण्यात आले आहे.

शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करून नवा आदर्श घालून दिला आहे.सर्वसाधारण परीस्थिती असताना स्वकमाईतुन आपल्या पाल्याच उच्च शिक्षण आणि एवढ दानत्व व सामाजिक कार्य करण्याची धडपड हीच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना दैनिक रोखठोकच्या वतीने “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४” देऊन गौरवण्यात येत आहे. आजच्या वाढदिवसाला ही बहुमूल्य भेट आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments