Homeनांदेडशेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश

शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश

नांदेडमधील बँकांना अचानक भेटी; ऑनलाइन सातबाऱ्यावरून कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना

नांदेड, प्रतिनिधी| शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविताना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. बुधवारी त्यांनी नांदेड शहरातील विविध बँकांना अचानक भेटी देऊन पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला आणि बँकेत आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी नवा मोंढा येथील भारतीय स्टेट बँक, वजीराबाद येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक, तारासिंग मार्केट परिसरातील पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रलंबित पीक कर्ज प्रकरणे, प्राप्त अर्ज आणि कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती घेतली.

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडे अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांना त्रास देऊ नये. उपलब्ध सुविधांचा वापर करून ऑनलाइन सातबारा उतारा प्राप्त करावा आणि पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या.

FB IMG 1792593060826 शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश

सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना येणाऱ्या अडचणींवरही त्यांनी चर्चा केली. अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार योग्य पर्याय शोधून कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ करावी. शेतकऱ्यांना शेतीच्या गरजांसाठी वेळेत आर्थिक मदत मिळेल, याची दक्षता बँकांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments