Homeनांदेडसोनारी शिवारात ४० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या :कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सोनारी शिवारात ४० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या :कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पीक नुकसानीसह कर्जबाजारीपणाच्या संकटाची चर्चा

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील सोनारी शिवारात एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अशोकराव उत्तम जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा तसेच आई-वडील असा परिवार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच डोक्यावर वाढत गेलेले कर्ज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेतून जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीय व स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे पिकांचे नुकसान, दुसरीकडे कर्जाचा वाढता भार आणि कुटुंबाच्या भवितव्याची चिंता यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून, “शेतकरी जगला पाहिजे आणि त्याचा संसार वाचला पाहिजे” अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे. सोनारी येथील घटनेनंतर शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानग्रस्तांना तातडीचा दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

अशोकराव जाधव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, कुटुंबीयांच्या दुःखात नागरिकांनी सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न कायमचा थांबवण्यासाठी कर्ज, पीक नुकसान, सिंचन, बाजारभाव आणि आर्थिक मदत या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी आणि इतर आवश्यक सवलती देऊन त्यांच्यावरील संकटाचा भार कमी करावा, जेणेकरून शेतकरी आत्महत्या थांबतील, अशी मागणी उपोषणकर्ते वामनराव पाटील वडगावकर यांनी केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments