जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत वीज समस्यांवर विचारविनिमय



नांदेड| विद्युत रोहित्रांची दुरुस्ती आणि बदलाची प्रक्रिया अधिक गतिमान करावी, तसेच आवश्यकतेनुसार ऑईलचा पुरवठा करून देखभालीचे काम तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी महावितरणला दिले आहेत.



नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी व पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.




