HomeनांदेडMayor Mrs. Kavita Mule : श्रावणानिमित्त नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे यांनि...

Mayor Mrs. Kavita Mule : श्रावणानिमित्त नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे यांनि घेतले श्री परमेश्वराचे दर्शन

श्री परमेश्वराची प्रतिमा देऊन पुष्पहार, शाल व श्रीफळाने स्वागत-सत्कार

हिमायतनगर, अनिल मादसवार | श्रावण मासानिमित्त नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन मनोभावे श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेड महानगरपालिकेतील सहकारी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील मारुतीरायाचे दर्शन व नगरभोजन कार्यक्रमासाठी महापौर मुळे हिमायतनगर येथे आल्या होत्या. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी श्री परमेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने महापौर सौ. कविता मुळे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांचा श्री परमेश्वराची प्रतिमा देऊन पुष्पहार, शाल व श्रीफळाने स्वागत-सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ व सर्व संचालक मंडळाच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर मुळे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरातील विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली. श्री परमेश्वर मंदिराची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचावी, मंदिराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्वागत-सत्काराबद्दल त्यांनी आभार मानले.

IMG20260901133610 01 Mayor Mrs. Kavita Mule : श्रावणानिमित्त नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे यांनि घेतले श्री परमेश्वराचे दर्शन
oplus_48

यावेळी भावना व्यक्त करताना महापौर कविता मुळे म्हणाल्या, “श्री परमेश्वराचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे, हे मी माझे भाग्य मानते. श्रावण महिन्यात श्री परमेश्वराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, त्यामुळे मनाला मोठे समाधान मिळाले. मंदिराच्या पुढील विकासासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.”

IMG20260901133610 011 Mayor Mrs. Kavita Mule : श्रावणानिमित्त नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे यांनि घेतले श्री परमेश्वराचे दर्शन

यावेळी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक तुलजेश यादव, साहेबराव गायकवाड, अभिषेक सौदे, सुमित मुथा, भालचंद्र पवळे, अपूर्व देशमुख, पत्रकार गोविंद करवा, हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिक भाई, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, आशिष सकवान, तालुका प्रमुख गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, श्री परमेश्वर मंदिराचे संचालक लताताई मुलंगे, संचालक मथुराबाई भोयर, संचालक वामनराव बनसोडे, संचालक राजाराम बलपेलवाड, संचालक अनिल मादसवार, संचालक संजय माने, संचालक विलास वानखेडे, कुणबी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष नारायण माने, उदय देशपांडे, मरोतराव लुम्दे, राम पतंगे, बालाजी ढोणे, पंडित ढोणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments