HomeकरियरApplication process : दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

Application process : दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज UDISE+ मधील PEN-ID वरून; ३१ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कात अर्जाची मुदत

नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE+ मधील PEN-ID वरून त्यांच्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत भरावी लागणार आहेत.

पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षेला प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि ITI अंतर्गत Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावरून ऑनलाइन भरावी लागणार आहेत.

अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा – नियमित शुल्कात नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी, खासगी, श्रेणीसुधार, तुरळक विषय आणि ITI Transfer of Credit विद्यार्थ्यांसाठी १९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांनी विहित पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. विलंब शुल्कासह १ ते १५ नोव्हेंबर २०२६ आणि अतिविलंब शुल्कासह १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अर्जाची प्रक्रिया करता येणार आहे. अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी, प्रतिदिन ५० रुपये राहणार आहे. माध्यमिक शाळांनी शुल्क पावती आणि विद्यार्थ्यांची Pre-List विभागीय मंडळाकडे ७ डिसेंबर २०२६ पर्यंत जमा करावी लागणार आहे.

अर्ज भरण्यापूर्वी शाळांनी माहिती तपासणे आवश्यक – सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षकांची माहिती अचूक भरून ती मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट केल्यानंतर शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणाऱ्या Pre-List ची प्रिंट काढून विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहिती जनरल रजिस्टरनुसार तपासावी. विद्यार्थी व पालकांची माहिती अचूक असल्याची खात्री करून संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी Pre-List वर घ्यावी. तसेच मुख्याध्यापकांनी पडताळणी केल्याबाबत प्रत्येक पानावर शिक्का व स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

UDISE+ मध्ये नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रक्रिया – नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE+ मधील PEN-ID वरून भरता येतील. UDISE+ मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास आवश्यक संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्र सादर करता येणार आहे. पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार, तुरळक विषय आणि ITI Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती UDISE+ मध्ये नसल्याने त्यांचे अर्ज निर्धारित कालावधीत प्रचलित पद्धतीने ऑनलाइन भरावे लागतील.

कौशल्य सेतू अभियानांतर्गत Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात संबंधित विषयासमोर Transfer of Credit अशी नोंद करावी. त्यानंतर आवेदनपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करणे आवश्यक आहे. APPAR-ID उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदही आवेदनपत्र भरताना करावी.

शुल्क भरण्याबाबत महत्त्वाच्या सूचना – शाळांनी विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रक्कम SBI च्या ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे अचूक भरावी. चलनाची प्रत आणि Pre-List विहित मुदतीत विभागीय मंडळाकडे जमा करावी.

शुल्क भरल्यानंतर संबंधित सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये Draft ऐवजी Send to Board आणि Payment Status मध्ये Not Paid ऐवजी Paid असा बदल झाला आहे की नाही, याची शाळांनी खात्री करावी. Send to Board आणि Paid Status असलेली आवेदनपत्रेच मंडळास प्राप्त झाल्याचे गृहीत धरून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जुने बँक चलन वापरू नये. तसेच मंडळाकडे रोख स्वरूपात परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही.

फोटो अपलोड करताना नियमांचे पालन आवश्यक – आवेदनपत्रासोबत अपलोड करण्यात येणारा फोटो व्यावसायिक पद्धतीने काढलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा असावा. फोटो JPG/JPEG स्वरूपातील आणि २५ ते ४० KB आकाराचा असणे आवश्यक आहे. फोटो मागील सहा महिन्यांत काढलेला असावा.

फोटोमध्ये विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्ट व समोरून दिसणारा असावा. दोन्ही डोळे व कान स्पष्ट दिसणे आवश्यक असून चेहऱ्यावर केस किंवा मास्क नसावा. पार्श्वभूमी पांढरी किंवा साध्या रंगाची असावी. शक्यतो विद्यार्थ्याने शालेय गणवेशात फोटो काढावा. चष्मा असल्यास डोळ्यांवर प्रकाशाचा परावर्तित झोत पडणार नाही, याची काळजी घ्यावी. फोटो केवळ JPEG (.jpg) स्वरूपात सेव्ह केलेला असावा. PNG किंवा BMP फाईलचे नाव बदलून JPG करू नये. आवेदनपत्र मंडळाकडे पाठवल्यानंतर आणि प्रवेशपत्र तयार झाल्यानंतर फोटोमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

अर्जातील माहिती काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन – विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मतारखेत आणि अन्य तपशीलांमध्ये चुका आढळत असल्याने आवेदनपत्रातील माहिती काळजीपूर्वक तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Pre-List किंवा आवेदनपत्राच्या Print Out वर विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.

आवेदनपत्रे भरताना चुका टाळण्यासाठी शाळांनी आवश्यकतेनुसार दुय्यम लॉगिन तयार करून संगणक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावेत आणि मुख्य लॉगिनद्वारे त्यांची तपासणी करावी.

विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. आवेदनपत्रे सादर करण्याच्या निर्धारित मुदतीत कोणतीही वाढ केली जाणार नसल्याने सर्व संबंधितांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव अनुपत्र भंडारी यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments