Homeनांदेडनांदेडच्या १३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; १०६ कोटी २५ लाख रुपये खात्यावर

नांदेडच्या १३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; १०६ कोटी २५ लाख रुपये खात्यावर

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ७ लाभार्थ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण; पात्र शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन

नांदेड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून सुमारे १०६ कोटी २५ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील सात लाभार्थी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती अर्थात बेबाक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले. पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

WhatsApp Image 2026 08 15 at 2.43.27 PM नांदेडच्या १३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; १०६ कोटी २५ लाख रुपये खात्यावर

कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. पहिल्या टप्प्यातच १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याने योजनेच्या अंमलबजावणीला वेग आल्याचे चित्र आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्येही कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे तालुकास्तरावरही पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ आणि प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

पात्र शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू आहे. मात्र लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

१३ हजार शेतकऱ्यांना १०६ कोटी २५ लाखांचा लाभ मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला मोठी चालना मिळाली असून, पुढील टप्प्यात आणखी पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments