Homeकरियरहु.ज.पा. महाविद्यालयातील विद्यार्थिनीची MANUU येथे एम.एस्सी. बॉटनीसाठी निवड

हु.ज.पा. महाविद्यालयातील विद्यार्थिनीची MANUU येथे एम.एस्सी. बॉटनीसाठी निवड

कु. आदिबा खानम हिचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश; महाविद्यालयात सत्कार

हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील विद्यार्थिनी कु. आदिबा खानम हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी (MANUU), हैदराबाद येथे एम.एस्सी. (बॉटनी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी निवड झाली आहे.

आदिबा खानम हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने तिचा प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या वडिलांचाही उपस्थित मान्यवरांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिबा खानम हिच्या यशाबद्दल महाविद्यालय परिवारातून तिचे अभिनंदन करण्यात आले असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा,” असा संदेश दिला. आदिबा खानम हिच्या यशामुळे हिमायतनगर परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments