Homeआरोग्यशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा; १०२ रुग्णवाहिकेची दुरुस्ती करण्याची...

शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा; १०२ रुग्णवाहिकेची दुरुस्ती करण्याची मागणी

नांदेड /किनवट, प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी भागातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाच परिचर (Peon) पदे तातडीने भरावीत तसेच १०२ रुग्णवाहिका दुरुस्त करून कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थ भोजराज पुंडलिकराव देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिक उपचारासाठी अवलंबून आहेत. मात्र, १ मार्च २०२६ पासून परिचरांची पाचही पदे रिक्त असल्याने रुग्णसेवा, आपत्कालीन मदत, स्वच्छता आणि इतर आवश्यक कामांवर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अनेक कामे करावी लागत असून रुग्णांना विलंबाचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच आरोग्य केंद्राकडे उपलब्ध असलेली १०२ रुग्णवाहिका अत्यंत खराब अवस्थेत असून तिचे दरवाजे व्यवस्थित उघडत नसल्याने आणि वाहन चालविताना मोठ्या प्रमाणात धक्के बसत असल्याने गंभीर रुग्ण, गर्भवती महिला व अपघातग्रस्तांना रेफर करताना जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

IMG 20260806 WA0050 शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा; १०२ रुग्णवाहिकेची दुरुस्ती करण्याची मागणी

आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी रिक्त पदे तातडीने भरून रुग्णवाहिका दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनाही देण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments