HomeनांदेडHimayatnagar : सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अवमानास्पद वक्तव्याचा हिमायतनगरात संतप्त निषेध

Himayatnagar : सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अवमानास्पद वक्तव्याचा हिमायतनगरात संतप्त निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन

हिमायतनगर,अनिल मादसवार| काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबाबत कथित अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी येथील श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात संतप्त आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित वक्तव्य हे महिलांचा, लोकशाही मूल्यांचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

IMG20260805110554 01 Himayatnagar : सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अवमानास्पद वक्तव्याचा हिमायतनगरात संतप्त निषेध
oplus_16

आंदोलनादरम्यान अशा प्रकारची बेताल, बेजबाबदार आणि खालच्या पातळीवरील भाषा कोणत्याही राजकीय नेत्याला शोभणारी नाही. राजकीय मतभेद असले तरी महिलांबाबत अपमानास्पद भाषा सहन केली जाणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला. आंदोलनात युवक विधानसभा अध्यक्ष अभिलाष जयस्वाल, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, युवक अध्यक्ष शितलभाऊ शेवनकर, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बाबा खान, जुनेदभाई कंपनी, शेख अफरोज, सलीम शेवालकर, माजीद कुरेशी, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, ओमकार चार्लेवार , रवी राठोड, जाबेद खान, संतोष साबळकर, सदाभाऊ काळे, लालू टेक्केवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

IMG20260805110353 01 Himayatnagar : सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अवमानास्पद वक्तव्याचा हिमायतनगरात संतप्त निषेध
oplus_16
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments