HomeनांदेडRoad caves : रस्ता खचला अन् कार १० फूट खड्ड्यात; प्राध्यापकांनी उडी...

Road caves : रस्ता खचला अन् कार १० फूट खड्ड्यात; प्राध्यापकांनी उडी मारून वाचवला जीव!

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरील धक्कादायक प्रकार; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप

नांदेड,प्रतिनिधी | नांदेड शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता मुसळधार पावसामुळे अचानक खचल्याने एक कार थेट सुमारे १० फूट खोल खड्ड्यात कोसळली. कारचे चालक प्रा. चंद्रशेखर येंगडे यांनी प्रसंगावधान राखत चालत्या वाहनातून उडी मारल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

दररोज हजारो विद्यार्थी, पालक आणि नागरिक याच मार्गाने ये-जा करतात. अशा ठिकाणी रस्ता खचून एवढा मोठा खड्डा निर्माण होणे हे संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणाचे द्योतक असल्याची तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता गौतम जैन व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “फी वेळेवर घेतली जाते; पण सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?” असा सवालही गौतम जैन यांनी उपस्थित होत आहे. ४८ तासांत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. निष्काळजी अधिकाऱ्यांवर BNS कलम 281 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. नुकसानग्रस्त वाहनधारकाला तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे 

FB IMG 1785415012177 Road caves : रस्ता खचला अन् कार १० फूट खड्ड्यात; प्राध्यापकांनी उडी मारून वाचवला जीव!

“आज कार खड्ड्यात पडली, उद्या एखादा विद्यार्थी किंवा नागरिक बळी गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments