Homeनांदेडछ.संभाजी नगर येथील दंत प्रशिक्षण शिबीरात डॉ. कनकदंडे यांचे योगदान -NNL

छ.संभाजी नगर येथील दंत प्रशिक्षण शिबीरात डॉ. कनकदंडे यांचे योगदान -NNL

नांदेड। छत्रपती संभाजी नगर येथील फेस क्लिनिक अँड रिसर्च सेंटर येथे दिनांक 29 जून 2024 व दिनांक 30 जून 2024 अशी शनिवार व रविवार दोन दिवशीय दंतरोपण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत नवीन दंतवैद्यांना डेंटल इम्प्लांट बद्दलचे प्रशिक्षण तसेच त्यांचे प्रात्यक्षिक डेमाँस्टेशन आणि प्रत्यक्ष रुग्णावर दंत रोपण करण्यात आले यामध्ये चार शस्त्रक्रिया, वैयक्तिक प्रात्यक्षिक तसेच 12 लेक्चर घेणात आले.

दंतरोपण हे आधुनिक उपचार पद्धती असल्याने दंतवैद्य शास्त्रातील बॅचलर ऑफ डेंटल सर्जन म्हणजेच बीडीएस ही डिग्री कोर्समध्ये याचे माहिती व प्रशिक्षण फार कमी प्रमाणात असते त्याकरिता एमडीएस म्हणजेच मास्टर ऑफ डेंटल सर्जन या पदव्युत्तर कोर्सची अत्यावश्यकता असते. पंरतु सर्वच डॉक्टर हे उच्च पदवीधर शिक्षण घेऊ शकत नाही. त्याकरिता ही दोन दिवशीय उच्च प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजनामुळे नविन दंत वैद्यकांना अचूक प्रशिक्षण व प्रात्यक्षिक बघायला मिळाल्यामुळे त्यांना दंत रोपन करण्यासाठी आत्मविश्वास वाढतो व ज्ञानात भर पडते त्यामुळे ते अद्यावत व अत्याधुनिक पद्धतीने आपल्या दैनंदिन सेवेमध्ये रुग्णांवर उपचार करू शकतात.

या प्रशिक्षण शिबीरामध्ये, डॉ. सिमीत शहा, डॉ. गोविद चांगुले, डॉ. सुजाता चांगुले, डॉ.अमोल डोईफोडे ,डॉ. विशाल पाटील, डॉ अरुण बालकुंदे, , डॉ. चेतन झंवर, डॉ. पुजा मुळे व डॉ. विनायक कनकदंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिरासाठी शिबीरातील मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. सिमीत शहा हे प्रसिद्ध दंतरोपण तज्ञ यांचे मार्गदर्शन हे होते ते मागील ३० वर्ष पेक्षा जास्त कालावधीपासून दंतरोपण करतात तसेच या शिबिराचे आयोजन व संचालक डॉ गोविंद व डॉ सुजाता चांगुले यांनी हे प्रशिक्षण आयोजन केले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments