छ.संभाजी नगर येथील दंत प्रशिक्षण शिबीरात डॉ. कनकदंडे यांचे योगदान -NNL
नांदेड। छत्रपती संभाजी नगर येथील फेस क्लिनिक अँड रिसर्च सेंटर येथे दिनांक 29 जून 2024 व दिनांक 30 जून 2024 अशी शनिवार व रविवार दोन दिवशीय दंतरोपण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत नवीन दंतवैद्यांना डेंटल इम्प्लांट बद्दलचे प्रशिक्षण तसेच त्यांचे प्रात्यक्षिक डेमाँस्टेशन आणि प्रत्यक्ष रुग्णावर दंत रोपण करण्यात आले यामध्ये चार शस्त्रक्रिया, वैयक्तिक प्रात्यक्षिक तसेच 12 लेक्चर घेणात आले.
दंतरोपण हे आधुनिक उपचार पद्धती असल्याने दंतवैद्य शास्त्रातील बॅचलर ऑफ डेंटल सर्जन म्हणजेच बीडीएस ही डिग्री कोर्समध्ये याचे माहिती व प्रशिक्षण फार कमी प्रमाणात असते त्याकरिता एमडीएस म्हणजेच मास्टर ऑफ डेंटल सर्जन या पदव्युत्तर कोर्सची अत्यावश्यकता असते. पंरतु सर्वच डॉक्टर हे उच्च पदवीधर शिक्षण घेऊ शकत नाही. त्याकरिता ही दोन दिवशीय उच्च प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
अशा प्रकारच्या कार्यशा...
